Home /News /viral /

उत्साहात डेटसाठी गेली पण...; प्रियकराने तरुणीची केली वाईट अवस्था, थेट रुग्णालयातच पोहोचली

उत्साहात डेटसाठी गेली पण...; प्रियकराने तरुणीची केली वाईट अवस्था, थेट रुग्णालयातच पोहोचली

या महिलेची ओळख काही आठवड्यांपूर्वीच ऑनलाईन एका व्यक्तीसोबत (Online Friendship) झाली होती. दोघांमध्ये चांगली ट्यूनिंग जमल्यानं त्यांनी डेटिंगचा प्लॅन केला.

    नवी दिल्ली 30 ऑक्टोबर : डेटिंगसाठी जाताना प्रत्येकजण एका चांगल्या पार्टनरची (Dating With Partner) आणि चांगल्या वागणुकीची कल्पना करत असतं. मात्र, अनेकदा असंही काही घडतं, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. मॅनचेस्टरमध्ये एका 36 वर्षाच्या महिलेसोबतही असंच घडलं. ती तयार होऊन अगदी आनंदात डेटिंगसाठी गेली (Dating Gone Wrong) खरी, मात्र तिच्यासोबत जे घडलं ते धक्कादायक होतं. गटारावर फटाके फोडताना अचानक उडाला भडका, Shocking VIDEO आला समोर या महिलेची ओळख काही आठवड्यांपूर्वीच ऑनलाईन एका व्यक्तीसोबत (Online Friendship) झाली होती. दोघांमध्ये चांगली ट्यूनिंग जमल्यानं त्यांनी डेटिंगचा प्लॅन केला. 17 सप्टेंबरला महिला तयार होऊन डेटसाठी गेली. सुरुवातीला सगळं ठीक होतं, मात्र डिनरनंतर या व्यक्तीनं आपल्या प्रेयसीला वाईट पद्धतीनं मारहाण केली आणि रात्रीच्या वेळी तिला रस्त्यावर सोडून तिथून निघून गेला. महिलेनं सांगितलं, की संध्याकाळच्या वेळी ती डेटसाठी गेली होती. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं. त्यांनी डिनर केला आणि थोडंफार ड्रिंकही. यानंतर कपल जेव्हा पार्किंगमध्ये गेलं तेव्हा या व्यक्तीची कार सापडत नव्हती. १५ मिनिटे कार शोधूनही न मिळाल्यानं दोघांमध्ये वाद सुरू झाला. याचदरम्यान कार सापडली आणि दोघंही कारमध्ये बसले. महिलेचा आरोप आहे, की कारमध्ये बसताच हा व्यक्ती भडकला. त्यानं महिलेचे पाय आणि केस पकडून तिला मारहाण केली आणि तिला कारमधून बाहेर फेकलं. इतकंच नाही तर जाण्याआधी त्याने तरुणीच्या चेहऱ्यावर ४ ते ५ वेळा बुक्क्यांनी मारा केला. सुट्टी मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यानं शोधलं अजब कारण; ऐकताच भडकला बॉस महिलेचं म्हणणं आहे, की ही घटना रात्री उशिरा घडली. अशात तिनं आपल्या मित्राला बोलावलं आणि रुग्णालयात पोहोचली. महिलेनं सांगितलं की आरोपीनं नंतर तिला फोन करून तब्येतीची चौकशी केली आणि म्हटलं की त्यानं आपल्या सुरक्षेसाठी असं केलं. मात्र, महिलेनं त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. आता पीडितेचं असं म्हणणं आहे की पोलिसही या प्रकरणात काहीच करत नाहीत. आरोपीनं मात्र दुसऱ्या मुलींसोबत ऑनलाईन चॅटिंग सुरू केली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Online dating, Viral news

    पुढील बातम्या