Home /News /viral /

मॉडेलचं ऑक्सिजन सिलेंडरसोबत बोल्ड फोटोशूट; लूक व्हायरल होताच भडकले लोक

मॉडेलचं ऑक्सिजन सिलेंडरसोबत बोल्ड फोटोशूट; लूक व्हायरल होताच भडकले लोक

नुकतंच एका मॉडेलनं हॅलोवीनसाठी फोटोशूट करून घेतलं, जे चांगलंच व्हायरल झालं आहे. यानंतर वादही सुरू झाला आहे (Controversial Halloween Photoshoot).

    नवी दिल्ली 30 ऑक्टोबर : जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी मागील दोन वर्ष एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे होते. या काळात कोरोना महामारीने अक्षरशः हाहाकार माजवला (Coronavirus in World). अजूनही जग यातून पूर्णपणे बाहेर पडलेलं नाही. या महामारीमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकांनी आपल्या कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तींचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यांसमोर पाहिला. हा क्षण विसरणं त्या व्यक्तींसाठी अतिशय कठीण आहे. अशात कोरोनाबाधितांसाठी संवेदनशीलता दाखवावी अशी अपेक्षा केली जाते. मात्र, कदाचित अनेकांनी याचाच अर्थच कळत नाही. नुकतंच एका मॉडेलनं हॅलोवीनसाठी फोटोशूट करून घेतलं, जे चांगलंच व्हायरल झालं आहे. यानंतर वादही सुरू झाला आहे (Controversial Halloween Photoshoot). या फोटोमधून महिलेनं कोरोनाबाधितांप्रती असंवेदनशीलता दाखवली आहे. साफसफाई करताना महिलेला कचऱ्यात सापडला चमकणारा दगड; किंमत ऐकताच बसला धक्का दीया कॅवलहीरो एक इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर आणि मॉडेलही आहे. सोशल मीडियावर तिला हजारो लोक फॉलो करतात. आपल्या बोल्ड फोटोजमुळे ती अनेकदा चर्चेचा विषय ठरते. मात्र, यावेळी तिनं असं काही केलं ज्यामुळे लोकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. दीयाने हॅलोवीनच्या पार्श्वभूमीवर आपलं रिसेन्ट फोटोशूटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत तिनं बोल्ड ड्रेस घातलेला आहे. मात्र यापेक्षा विवादित हे आहे, की तिने फोटोशूटमध्ये कोरोना रुग्णाचा लूक केला आहे (Model Dressed as ill corona patient) . तिनं हातात ऑक्सिजन सिलेंडर (Bold Photoshoot with Oxygen Cylinder) पकडला आहे आणि तोंडावर मास्कही लावलं आहे. डेटसाठी गेली पण...; प्रियकराने तरुणीची केली वाईट अवस्था, थेट रुग्णालयातच पोहोचली तिनं डोळ्यांच्या खाली आणि चेहऱ्यावर डार्क मेकअपही केला आहे. यामुळे असं वाटत आहे की ती गंभीररित्या आजारी आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर लोक तिच्यावर टीका करत आहेत. दीयानं याबाबत बोलताना म्हटलं की तिचा उद्देश लोकांना जागरूक करणं हा होता. लोकांनी लस घ्यावी हा संदेश मला यातून द्यायचा होता, कोणाचा अपमान करायचा नव्हता, असंही ती म्हणाली. आपल्या या फोटोशूटमधून ती लोकांना सांगू इच्छित होती, की कोरोना किती गंभीर आहे. यामुळे लस घेणं आणि कोरोना नियमांचं पालन करण्याबाबत लोकांना जागरुक करणं हाच तिचा उद्देश होता. हॅलोवीनच्या दोन दिवस आधी दीयाने हे फोटो शेअर केले आहेत. हॅलोवीन पश्चिमी देशांमध्ये अगदी उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. लोक सणांच्या दिवशी सुंदर कपडे घालतात आणि सजतात. मात्र या सणाला लोक भूतांप्रमाणे तयार होतात आणि भीतीदायक मेकअप करतात.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bold photoshoot, Viral photo

    पुढील बातम्या