Home /News /viral /

मोठ्या उत्साहाने लग्नाच्या तारखेचा टॅटू हातावर गोंदवला; ऐनवेळी घडलं असं काही की हादरलं कपल

मोठ्या उत्साहाने लग्नाच्या तारखेचा टॅटू हातावर गोंदवला; ऐनवेळी घडलं असं काही की हादरलं कपल

मायकल क्रेन आणि त्याची होणारी पत्नी लिंडा ब्राऊन यांचं चेशायरच्या वारिंगटनमध्ये 5 ऑगस्टला लग्न होणार होतं. लग्नासाठी या हॉटेलच्या बुकींगकरता त्यांनी 4 लाख रूपये दिले होते

    नवी दिल्ली 13 फेब्रुवारी : आपलं लग्न कायम आठवणीत राहावं, यासाठी त्यादिवशी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) करत असतात. आपलं लग्न आयुष्यभर स्मरणात राहावं यासाठी एका व्यक्तीने लग्नाची तारीख आणि वेळ याचाच टॅटू (Tattoo) आपल्या हातावर गोंदवून घेतला. जेणेकरून हा क्षण कायम लक्षात राहावा. मात्र, हा दिवस येण्याआधीच ज्या हॉटेलमध्ये त्यांचं लग्न होणार होतं, ते हॉटेल बंद झालं आणि त्याचा वापर दुसऱ्याच कामासाठी करणार असल्याचं ठरलं. प्रेयसी झोपताच 85 महिलांना मेसेज पाठवायचा प्रियकर; लिहायचा 'हा' एकच शब्द Dailymail च्या वृत्तानुसार, 37 वर्षीय माइकल क्रेन आणि 42 वर्षीय लिंडा ब्राऊन त्या जोडप्यांपैकी एक होते, ज्यांच्या स्वप्नातील विवाहस्थळ लग्नाच्या एक दिवस आधी अचानक बंद झालं. ब्रिटनमधील बेस्ट वेस्टर्न पार्क हॉटेल बंद झालं कारण त्यांना हे हॉटेल नव्या रूपात सुरू करायचं होतं. त्यामुळे त्यादिवशी या हॉटेलमध्ये होणारी लग्न रद्द झाली. यामुळे नवरदेवाला आपल्या लग्नाची वेळ आणि तारीख यासोबतच टॅटूही बदलावा लागला. नवरदेवाने हा खास टॅटू गोंदवण्यासाठी 18 हजार रूपये खर्च केले होते. मायकल क्रेन आणि त्याची होणारी पत्नी लिंडा ब्राऊन यांचं चेशायरच्या वारिंगटनमध्ये 5 ऑगस्टला लग्न होणार होतं. लग्नासाठी या हॉटेलच्या बुकींगकरता त्यांनी 4 लाख रूपये दिले होते. हॉटेल बंद झाल्यानंतर आपले पैसे परत मागणाऱ्या जोडप्यांना शांत करण्यासाठी पोलिसांनाही बोलावलं गेलं होतं. रेल्वेखाली अडकलेल्या मुलीला वाचवायला गेला तरुण;26 डबे अंगावरुन गेले अन्.., Video मायकल क्रेन आणि त्याची होणारी पत्नी लिंडा त्या हजारो जोडप्यांमधील होते, ज्यांच्या लग्नासाठी कोणतीच जागा नव्हती. लग्नाच्या दिवशीच हे सगळं घडल्यामुळे मायकल आपल्या टॅटूमध्ये 5 तारखेच्या जागी 6 तारीख करून घेऊ शकतो, मात्र लग्नाची वेळ चुकीचीच असेल. आता या गोष्टीचा पश्चाताप त्याला आयुष्यभर असेल.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Marriage, Tattoo, Wedding

    पुढील बातम्या