भोपाळ 12 फेब्रुवारी: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका कारपेंटरने स्वतःचा जीव धोक्यात घालून एका मुलीचा जीव वाचवला. ही घटना बारखेडी परिसरात घडली. ही मुलगी एका पार्क केलेल्या मालगाडीच्या खालून रुळ ओलांडत होती. तिलाही हे समजलं नाही की अचानक मालगाडी सुरू कधी झाली. गाडी पुढे सरकताच मुलीने आरडाओरडा सुरू केला. तिला गाडीखाली अडकल्याचं (Girl Trapped under Moving Train) पाहून घटनास्थळी उपस्थित सुतार मेहबूब जीवाची पर्वा न करता मालगाडीखाली शिरले. त्यांनी मुलीला पकडून रुळावर झोपवलं (Man Saves Life of a Girl).
यादरम्यान ट्रेनचे 26 डबे या दोघांवरून गेले. मात्र, दोघंही पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. घटना ५ फेब्रुवारीची आहे. मानवतेचा आदर्श घालून देणारी स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या शोएब हाश्मीने शुक्रवारी मेहबूब यांचा गौरव केला. मेहबूबकडे मोबाईल नव्हता म्हणून शोएबने त्यांना मोबाईल भेट म्हणून दिला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील मंडीदीप-भोपाळ दरम्यान बस चालवतात.
विशेष म्हणजे मोहम्मद मेहबूबचं वय 36 वर्षे आहे. ते अशोक बिहार बँक कॉलनीत राहातात आणि फर्निचर बनवण्याचं काम करतात. त्यांनी सांगितलं कि, 5 फेब्रुवारी रोजी रात्री 8 च्या सुमारास ते सोनिया कॉलनीतून नमाज अदा करून कारखान्याकडे जात होते. दरम्यान, बारखेडी रेल्वे फाटकावर एक मालगाडी येऊन थांबली. लोक त्याच ट्रेनखालून रुळ ओलांडू लागले. इतक्यात अचानक ट्रेन सुरू झाली आणि रुळ ओलांडणारी एक मुलगी त्याखाली अडकली.
ही मुलगी मदतीसाठी ओरडू लागली. तिला पाहून मेहबूब लगेचच ट्रेनच्या दिशेने गेले आणि हळू वेगात चालणाऱ्या या ट्रेनखाली शिरले. जीवाची पर्वा न करता त्यांनी हे पाऊल उचललं. य मुलीला घेऊन ते रुळावर सपाट झोपले. यामुळे मालगाडीचे २६ डबे त्यांच्यावरून गेले तरीही त्यांना काहीही झालं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Railway track accident, Shocking news, Shocking video viral, Train