Home /News /viral /

प्रेयसी झोपताच 85 महिलांना मेसेज पाठवायचा प्रियकर; लिहायचा 'हा' एकच शब्द, असं फुटलं बिंग

प्रेयसी झोपताच 85 महिलांना मेसेज पाठवायचा प्रियकर; लिहायचा 'हा' एकच शब्द, असं फुटलं बिंग

टोरीला आपल्या प्रियकराच्या फोनमध्ये डेटिंग अॅप दिसलं. जेव्हा हे अॅप तिने उघडलं, तेव्हा ती समजलं की तिचा प्रियकर नवनवीन महिलांसोबत बोलण्यात अतिशय उत्सुक होता.

    नवी दिल्ली 11 फेब्रुवारी : सध्या व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरू आहे. या आठवड्यात लोक आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, त्याच्याजवळ ते व्यक्त करतात आणि नातं अधिक खास बनवण्याचा प्रयत्न करतात. लोक प्रेम आणि विश्वासाच्या आधारे हे नातं बनवतात. मात्र, सोशल मीडियावर एका महिलेनं अतिशय दुःखी मनाने आपल्या प्रियकराचं खरं रूप लोकांसमोर आणलं. या महिलेला आपला प्रियकर धोका (Cheater Boyfriend) देत असल्याचं समजताच तिने ब्रेकअप (Breakup) केलं. प्रेयसीच्या नकळत हा व्यक्ती 85 महिलांना मेसेज करून त्यांच्यासोबत फ्लर्ट (Man Flirting With 85 Women) करत असे. ब्रेकअपनंतर महिलेनं त्या मेसेजबद्दलही लोकांना सांगितलं, जो मेसेज तिचा प्रियकर सर्व महिलांना पाठवत असे. 'माझ्यावर प्रेम कर, नाहीतर नोकरी सोड'; महिलेनं बॉडीगार्डसमोर ठेवली अट अन्... सोशल मीडियावर टोरी नावाच्या महिलेनं आपल्या प्रियकराने दिलेल्या धोक्याची कथा शेअर केली आहे. टोरीला आपल्या प्रियकराच्या फोनमध्ये डेटिंग अॅप दिसलं. जेव्हा हे अॅप तिने उघडलं, तेव्हा ती समजलं की तिचा प्रियकर नवनवीन महिलांसोबत बोलण्यात अतिशय उत्सुक होता. त्याने तब्बल 85 महिलांना मेसेज केला होता. मात्र, हैराण करणारी बाब म्हणजे यातील कोणीच या व्यक्तीला भाव दिला नव्हता. टोरीने आपल्या प्रियकराने दिलेल्या या धोक्याबद्दल एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. व्हिडिओ आतापर्यंत 9 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. टोरीने सांगितलं की पार्टनरच्या फोनमधून त्याने केलेल्या विश्वासघाताचा खुलासा होण्यापेक्षा वाईट काय असेल. जेव्हा मी माझ्या प्रियकराचा फोन बघितला तेव्हा समजलं की त्यानं ८५ महिलांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापेक्षाही लाजिरवाणी गोष्ट म्हणजे, यातील कोणालाच त्याच्यासोबत बोलायची इच्छा नव्हती. टोरीने म्हटलं की जेव्हा मला समजलं की तो मला धोका देण्यासाठी किती उतावळा आहे, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. यानंतर तिने स्वतःच त्याच्यासोबत ब्रेकअप केलं. पाहूया तुम्ही प्रेमाची ही परीक्षा पास करताय का; या फोटोत Heart balloon शोधा टोरीने पुढे सांगितलं की तिचा एक्स सर्व महिलांना केवळ 'हाय' एवढाच मेसेज करत होता. मात्र कोणीही त्याला भाव दिला नाही. आता टोरीने या व्यक्तीसोबतचं आपलं नातं तोडलं आहे आणि ती आपल्या आयुष्यात पुढे गेली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Breakup, Love story

    पुढील बातम्या