• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • आधी पोट नंतर डोक्यावरून गेलं चाक; गाडीखाली चिरडूनही तरुणाला काहीच झालं नाही; पाहा Shocking video

आधी पोट नंतर डोक्यावरून गेलं चाक; गाडीखाली चिरडूनही तरुणाला काहीच झालं नाही; पाहा Shocking video

त्याच्या शरीरावरून दोन वेळा गाडी गेली पण त्याला साधं खरचटलंही नाही.

 • Share this:
  मुंबई, 28 ऑक्टोबर : एखाद्या गाडीने धडक (Accident) जरी दिली तरी गंभीर दुखापत होते. पण अपघाताचा एक असा व्हिडीओ (Accident video)  व्हायरल (Viral video) होतो आहे, जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. एका तरुणाच्या अंगावरून गाडी गेली. तरी त्या तरुणाला साधं खरचटलंही नाही (Car hit man). गाडीचं चाक त्याच्या शरीरावरून जाऊनही तो सुखरूप होता (Car run over man). अपघाताचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, जे धडकी भरवणारे होते. पण अपघाताचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही हादरालाच. अंगावरून चाक जाऊनही कुणाला काहीच कसं होऊ शकत नाही, असाच प्रश्न तुम्हाला पडेल. किंबहुना व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. व्हिडीओत पाहू शकता एक गाडी जात असते. इतक्यात दुसऱ्या बाजूने एक तरुण स्कूटरवरून येतो. गाडी त्या तरुणाला धडकते आणि तरुण जमिनीवर पडतो. तरुण गाडीच्या खालीच जातो. गाडजी त्याच्या अंगावरून जाते. तेव्हा अक्षरशः अंगावर काटाच येतो. पण पुढे जे दृश्य दिसतं ते पाहून धक्काच बसतो. बेस्ट व्हिडीओज ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. गाडीच्या पुढील एका चाकाखाली हा तरुण येतो. गाडी पुढे जाताना सुरुवातीला त्याच्या पोटावरून चाक जातं. तरी तरुणाची हालचाल सुरू असते. गाडीचं चाक थोडं पुढे गेल्यानं तरुण गाडीखालून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्यात गाडी पुन्हा मागे येते तेव्हा हेच चाक त्याच्या डोक्यावरून जातं. तेव्हा घामच फुटतो. आता काय हा तरुण जिवंत राहिला नसावा असंच वाटतं. पण गाडी मागे जाताच तरुण स्वतःच उठून बसतो. हे वाचा - Shocking! बायको-चिमुकल्यासह मृत्यूच्या दाढेत गेला बाईकचालक; 2 बसच्या मध्ये चिरडले; भयंकर अपघाताचा VIDEO गाडी अंगावरून जाऊनही त्याला काहीच झालेलं नाही. त्यांच्या एकंदर हालचालीवरून त्याला थोड्या वेदना होत असल्याचं दिसतं आहे. पण त्याला गंभीर दुखापत झाल्याचं काही दिसत नाही. त्याच्या अंगावर साधं खरचटलेलंही दिसत नाही. गेल्या महिन्यात गुजरातमध्येही अशाच एका भयंकर अपघातातून एक तरुण बचावला होता. एकीकडे खड्डे आणि दुसरीकडे पावसामुळे साचलेलं पाणी अशा दुहेरी आव्हानांचा सामना करत एक दुचाकीस्वार एक महिला आणि छोट्या बाळाला घेऊन दुचाकीवरून चालला होता. त्याच्या डाव्या बाजूने एक ट्रॅक्टर पास होत होता, तर उजव्या बाजूला पावसाचं पाणी साचलं होतं. या दोन्हीच्या मधून बाईक नेत असताना अचानक गाडी स्लिप झाली. ट्रॅक्टरच्या मागच्या चाकापाशी आल्यानंतर बाईक घसरली आणि बाईकचालक, महिला आणि लहान बाळ तिघेही ट्रॅक्टरखाली पडले. मात्र त्याचवेळी पडता पडता ही गाडी फिरल्यामुळे महिला आणि बाळ हे ट्रॅक्टरपासून काहीसे दूर ओढले गेले. त्यांच्या अंगावर ट्रॅक्टरचे चाक आले नाही. सर्वात पुढे आणि ट्रॅक्टरच्या जवळ असणाऱ्या दुचाकी चालकाच्या मात्र डोक्यावरून आणि मानेवरून ट्रॅक्टरचं मागचं चाक गेलं. हा व्हिडिओ पाहत असताना जेव्हा ट्रॅक्टरचं चाक बाईकसस्वाराच्या डोक्यावरून जातं, त्यावेळी या घटनेत त्याचा मृत्यू निश्चित झाला असावा, असंच सुरुवातीला वाटतं. मात्र हा चमत्कार म्हणायचा की नशीब, असा प्रश्न त्यानंतरची दृश्यं पाहिल्यावर पडतो. हे वाचा - गिअर टाकला अन् थेट बाईक घेऊन दुकानातच शिरला, भिवंडीतला VIDEO व्हायरल डोक्यावरून बाईकचं चाक जाऊनदेखील हा दुचाकीस्वार उठून उभा राहिला. अर्थात, या दुचाकीस्वारानं हेल्मेट घातलं होतं. मात्र ट्रॅक्टरखाली पडल्या पडल्या हे हेल्मेट त्याच्या डोक्यातून निघाल्याचंही व्हिडिओत दिसतं. त्यामुळे हेल्मेट नसतानाही डोक्यावरून ट्रॅक्टरचं चाक जाऊन हा माणूस कसा वाचला, असा प्रश्न सर्वांनाच पडला.
  Published by:Priya Lad
  First published: