मराठी बातम्या /बातम्या /Viral /

गिअर टाकला अन् थेट बाईक घेऊन दुकानातच शिरला, भिवंडीतला VIDEO व्हायरल

गिअर टाकला अन् थेट बाईक घेऊन दुकानातच शिरला, भिवंडीतला VIDEO व्हायरल

मग काय, बाईकवरील या तरुणाचे नियंत्रण सुटले आणि या तरुणासह बाईक थेट फोटो स्टुडिओत शिरली.

मग काय, बाईकवरील या तरुणाचे नियंत्रण सुटले आणि या तरुणासह बाईक थेट फोटो स्टुडिओत शिरली.

मग काय, बाईकवरील या तरुणाचे नियंत्रण सुटले आणि या तरुणासह बाईक थेट फोटो स्टुडिओत शिरली.

भिवंडी, 26 ऑक्टोबर : कधी कधी दुचाकी (bike) किंवा स्कुटरवरील (Scooty) नियंत्रण सुटल्यामुळे एखादी तरुणी-तरुण तुम्ही मंदिरात किंवा थेट भिंतीवर जाऊन आदळल्याचा व्हिडीओ पाहिला असेल. पण, भिवंडीमध्ये (Bhiwandi) एका पठ्ठ्याने पहिला गिअर टाकला आणि दुचाकी थेट दुकानातच घेऊन पोहोचल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका येथील पटेल नगर इथंही गंमतीशीर घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. या घटनेचा थरार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला.

पटेल नगर येथे हर्षित डिजिटल फोटो स्टुडिओ असून त्या दुकानातील कामगार दुकानाच्या काऊंटरवर उभा होता. तर दुकानासमोर एक तरुण दुचाकीवर बसून होता, तो बाईक सुरू करून जाण्याच्या तयारीत होता.

पण, या तरुणाने बाईक गिअरमध्ये असताना सुरू केली असता ती लगेच सुरू झाली आणि तिचा वेग अधिक असल्याने त्याने ब्रेक दाबण्याच्या प्रयत्नात एक्सलेटर जोरात फिरविले.

गँगस्टर मोहोळच्या पत्नीला भाजपमध्ये प्रवेश दिला का? चंद्रकांत पाटील म्हणाले...

मग काय, बाईकवरील या तरुणाचे नियंत्रण सुटले आणि या तरुणासह बाईक थेट फोटो स्टुडिओत शिरली. यामध्ये दुकानातील डिजिटल फ्लॅश व इतर साहित्याचे नुकसान झाले. मात्र कामगाराने प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी टळली आहे. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली असून हा सीसीटीव्ही व्हिडीो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

First published: