• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • भलताच खटाटोप! चोरानं लढवलेली शक्कल पाहून चक्रावून जाल; Viral होतोय VIDEO

भलताच खटाटोप! चोरानं लढवलेली शक्कल पाहून चक्रावून जाल; Viral होतोय VIDEO

हा व्हिडिओ (Funny Video of Theft) एका गल्लीतील आहे. यात एक चोर चोरी करण्यासाठी गल्लीत इकडे-तिकडे फिरताना दिसतो.

 • Share this:
  नवी दिल्ली 27 ऑक्टोबर : चोर फक्त संधीच्या शोधात असतात आणि संधी मिळताच ते चोरी करतात. अनेकदा चोर दिवसाढवळ्या आणि गर्दीच्या ठिकाणीदेखील चोरी करतात, तर अनेकदा ते चोरी करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करतात, जे पाहून सगळेच हैराण होतात. सध्या एका अशाच चोराचा व्हिडिओ (Viral Video of Thief) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून कोणीही थक्क होईल. VIDEO - ...अन् नवरदेवाला सोडून पळाली नवरी; असं काही केलं की सर्वजण पाहतच राहिले हा व्हिडिओ (Funny Video of Theft) एका गल्लीतील आहे. यात एक चोर चोरी करण्यासाठी गल्लीत इकडे-तिकडे फिरताना दिसतो. तो याठिकाणी उभा राहून असं वागत असतो, की कोणालाच त्याच्यावर संशयही येणार नाही की तो चोरी करायला आला आहे. त्याच्या या सर्व हालचाली कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत. याच घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक चोर चोरीसाठी अतिशय हुशारीनं डोकं लावतो. तो एक सायकल चोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, चोरी करण्याआधी तो इतकं काही करतो, जे पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हा व्हिडिओ मजेशीर करण्यासाठी बॅकग्राउंडमध्ये money heist वेबसीरिजचं o bella ciao म्यूझिक वाजत आहे.
  सोशल मीडियावर मोबाईल चोर महिलेचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. लोक यावर कमेंट करून निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, भाईसाहब काय चोरी केली. तर, दुसऱ्या एकानं लिहिलं, अशा लोकांपासून सावध राहायला हवं. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 5 वर्षीय चिमुकलीने कॅनव्हासवर रेखाटलं सुरेख चित्र; VIDEO पाहून म्हणाल 'WOW'! इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ ‘giedde’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर कऱण्यात आला आहे. या व्हिडिओला मजेशीर कॅप्शनही देण्यात आलं आहे. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की लोक तो वारंवार पाहत असून इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: