• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 5 वर्षीय चिमुकलीने कॅनव्हासवर रेखाटलं अतिशय सुरेख चित्र; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'WOW'!

5 वर्षीय चिमुकलीने कॅनव्हासवर रेखाटलं अतिशय सुरेख चित्र; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'WOW'!

सध्या एका लहान मुलीने बनवलेली पेंटिंग चांगलीच व्हायरल (Small Girl Painting Video Viral) होत आहे. ही पेंटिंग पाहून तुम्हाला वाटणारही नाही की ती एका पाच वर्षाच्या मुलीनं बनवली आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 27 ऑक्टोबर : पेंटिंग करणं प्रत्येक लहान मुलाला आवडतं. याच कारणामुळे अगदी लहान वयापासूनच मुलांना पेन्सिल किंवा पेनपेक्षा रंगांसोबत खेळायला जास्त आवडतं. बहुतेकदा लहान मुलांची पेंटिंग पाहूनच आपल्याला अंदाज येतो की ही त्यांनी बनवली आहे. मात्र, सध्या एका लहान मुलीने बनवलेली पेंटिंग चांगलीच व्हायरल (Small Girl Painting Video Viral) होत आहे. ही पेंटिंग पाहून तुम्हाला वाटणारही नाही की ती एका पाच वर्षाच्या मुलीनं बनवली आहे. या सुंदर पेंटिंगची सध्या सोशल मीडियावर (Social Media) एकच चर्चा रंगली आहे. गिअर टाकला अन् थेट बाईक घेऊन दुकानातच शिरला, भिवंडीतला VIDEO व्हायरल व्हायरल कंटेंटसाठी प्रसिद्ध असलेलं ट्विटर अकाऊंट buitengebieden_ वरुन हा व्हिडिओ (Twitter Video) नुकताच शेअर केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये एक ५ वर्षाची मुलगी आपल्या उंचीपेक्षाही मोठ्या कॅनव्हॉसवर पेंटिंग करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की ही मुलगी भरपूर कलरफूल पेन्टर्ससोबत पेंटिंग डिझाईन करताना दिसत आहे. यात काही कार्टून कॅरेक्टरही दिसतात आणि त्यांचे गोल गोल डोळेही. या मुलीचा ड्रेसही यात दोन ते तीन वेळा बदलल्यासारखा दिसतो, याचाच अर्थ कदाचित ही पेंटिंग बनवण्यासाठी तिला काही दिवस लागले आहेत. हा व्हिडिओ लोकांच्या इतका पसंतीस उतरत आहे की याला 1.4 मिलियन म्हणजेच १४ लाखाहून अधिका व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो लोकांनी हा व्हिडिओ रिट्विटही केला आहे. लग्नातील मस्ती नवरीबाईला पडली भारी, नवरदेवही वाचवूू शकला नाही; VIDEO VIRAL सोशल मीडियावर अनेकांनी या चिमुकलीचं कौतुक केलं आहे. एका व्यक्तीनं कमेंट करत म्हटलं की हे खरंच आश्चर्यकारक आहे. आशा आहे , की या मुलीसोबत आयुष्यभर ही कला अशीच राहो. आणखी एकानं कमेंट करत लिहिलं, की या चिमुकलीची कला खरंच कौतुकास्पद आहे. मात्र, मी तिच्या पालकांचंही कौतुक करेल ज्यांनी तिला न अडवता हवं तसं पेंट वापरू दिला. एकानं तर असंही म्हटलं की ही चिमुकली मोठी होऊन खूप फेमस पेंटर बनेल. काहींना मात्र या चिमुकलीची पेंटिंग आवडलेली नाही. काही यूजर्सनी कमेंट करत लिहिलं, की तिची पेंटिंग अजिबातही अनोखी नाही. ही कोणीही करू शकतं.
  Published by:Kiran Pharate
  First published: