मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - ...अन् नवरदेवाला सोडून पळाली नवरी; भरमंडपातच केलं असं काही की सर्वजण पाहतच राहिले

VIDEO - ...अन् नवरदेवाला सोडून पळाली नवरी; भरमंडपातच केलं असं काही की सर्वजण पाहतच राहिले

नवरीबाईने नवरदेवासह सर्वांनाच दिलं सरप्राइझ.

नवरीबाईने नवरदेवासह सर्वांनाच दिलं सरप्राइझ.

नवरीबाईने नवरदेवासह सर्वांनाच दिलं सरप्राइझ.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 27 ऑक्टोबर : लग्नात (Wedding video) नवरा-नवरी (Bride Groom video) दोघांनाही एकमेकांना आपण कधी पाहतो याची उत्सुकता असते. त्यामुळे दोघंही एकमेकांची आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. एकमेकांची एक झलक पाहण्यासाठी डोळे लावून बसलेले असतात. जेव्हा ते लग्नात एकमेकांसमोर येतात तेव्हा त्यांच्या नजरा एकमेकांवरून हटत नाही. मग दोघंही एकमेकांमध्ये गुंतून जातात. बहुतेक लग्नात असंच पाहायला मिळतं. पण सध्या अशा एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Bride Groom)  झाला आहे, ज्यात भरमंडपात नवरीबाई नवरदेवाला सोडून पळाली (Bride ran away from groom) आणि त्यानंतर पुढे तिने जे केलं ते पाहून सर्वजण हैराण झाले (Bride gave surprise to groom).

नवरदेवाशेजारी गप्पपणे बसलेली नवरी अचानक उठते आणि नवरदेवापासून दूर पळत जाते. नवरदेवापासून दूर जात तिने जे केलं ते सर्वांसाठीच मोठं सरप्राइझ होतं. नवरदेव, नातेवाईक, पाहुणे सर्वजण नवरीकडे पाहतच राहिले. कुणीच विचार केला नव्हता की नवरीबाई असं काही करेल.

View this post on Instagram

A post shared by - (@wedding_fairs)

व्हिडीओत पाहू शकता, सुरुवातीला नवरा-नवरी एकमेकांच्या बाजूला बसलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूला नातेवाईकही बसलेले आहेत. अचानक एक गाणं लागतं आणि नवरी हलू लागते.

हे वाचा - VIDEO - सासरी पोहोचताच नवरीला मोठा धक्का, दीरांनी जे केलं ते पाहून सर्व शॉक

बसल्या बसल्या नवरी नाचू लागते. नवरदेवाला ती धक्के मारतानाही दिसते. तेव्हा नवरदेवही लाजताना दिसतो. मग अचानक नवरी उठते आणि तिथून पळू लागते. सर्वांच्या समोर अगदी मधोमध जाते आणि डान्स करू लागते. 'पालकी में होके सवार चली रे, मैं तो अपने साजन के द्वार चली रे...' या प्रसिद्ध बॉलिवूड गाण्यावर ती जबरदस्त परफॉर्मन्स देते.

निशिका खत्री द इन्फ्लुएन्सर इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नवरीबाईचा हा अंदाज सर्वांना आवडला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

हे वाचा - VIDEO: आधी लगावले जोरदार ठुमके, मग ढसाढसा रडू लागली नवरी; कारण जाणून व्हाल हैराण

याआधीपण अशाच एका नवरीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. इन्स्टाग्रामवर नोज वेडिंग क्रिएशन नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे.

व्हिडीओत पाहू शकता नवरी आणि नवरदेव लग्नाच्या स्टेजवर बसलेले आहेत. इतक्यात नवरदेव आणि तिथे उपस्थित पाहुण्यांना सरप्राईज देण्यासाठी नवरी स्टेजवर उभी राहते. यानंतर नवरीसाठी एक गाणं वाजवलं जातं आणि नवरीबाई त्यावर थिरकू लागते. इतकंच नाही तर जेव्हा नवरी पळत स्टेजवर आली तेव्हा नवरदेवाचा चेहरा पाहण्यासारखा झालेला.  व्हिडिओ पाहून असं वाटतं, की हे सगळं आधीपासूनच प्लॅन केलं गेलं असावं. नवरीच्या चेहऱ्यावरील हावभाव मन जिंकणारे आहेत.

First published:

Tags: Bride, Bridegroom, Viral, Viral videos, Wedding video