जाहिरात
मराठी बातम्या / Viral / प्रियकराचा प्रताप! गर्लफ्रेंड सुंदर असल्याने सोडायला लावली नोकरी; आता तिला आनंदी ठेवण्यासाठी रोज करतो हे काम

प्रियकराचा प्रताप! गर्लफ्रेंड सुंदर असल्याने सोडायला लावली नोकरी; आता तिला आनंदी ठेवण्यासाठी रोज करतो हे काम

प्रियकराचा प्रताप! गर्लफ्रेंड सुंदर असल्याने सोडायला लावली नोकरी; आता तिला आनंदी ठेवण्यासाठी रोज करतो हे काम

आपल्या गर्लफ्रेंडच्या सौंदर्यावर फिदा असलेल्या या प्रियकराचं असं म्हणणं आहे की ती अतिशय सुंदर आहे. यामुळे तिच्या नोकरीपेक्षाही तिचं सौंदर्य अधिक खास आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 01 जानेवारी : गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचं (Girlfriend-Boyfriend) नातं अतिशय अनोखं असतं. यात एकमेकांच्या प्रेमापोटी ते कोणत्याही थराला जायलाही तयार असतात. काहीसं असंच नातं 23 वर्षाची तरुणी आणि तिच्या 57 वर्षाच्या बॉयफ्रेंडचं आहे. यातील बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडच्या सौंदर्यावर (Pretty Girlfriend) भलताच फिदा आहे. रुग्णालयात अल्पवयीन मुलीसोबत अनोळखी तरुणाचे अश्लील चाळे, आधी मिठी मारली मग… आपल्या गर्लफ्रेंडच्या सौंदर्यावर फिदा असलेल्या या प्रियकराचं असं म्हणणं आहे की ती अतिशय सुंदर आहे. यामुळे तिच्या नोकरीपेक्षाही तिचं सौंदर्य अधिक खास आहे. असंच म्हणून त्याने आपल्या प्रेयसीला नोकरी सोडायला लावली आहे. इतकंच नाही तर तिला आनंदी ठेवण्यासाठी तो वर्षातील 365 दिवस तिला काही ना काही गिफ्ट देत राहतो. ही बाब या कपलने टिकटॉक व्हिडिओच्या (Tiktok Video) माध्यमातून शेअर केली आहे. त्यांची ही अनोखी लव्ह स्टोरी लोकांच्या पसंतीस उतरत आहे. 23 वर्षाच्या गर्लफ्रेंडवर फिदा असलेल्या 365 वर्षाच्या बॉयफ्रेंडने तिच्यासोबत साखरपुडाही केला आहे. हे दोघंही टिकटॉकवर अतिशय प्रसिद्ध आहेत. व्हिडिओमध्ये तरुणीने सांगितलं की तिचा बॉयफ्रेंड तिला दररोज गिफ्ट देतो. त्याचं असं म्हणणं आहे की त्याची गर्लफ्रेंड अतिशय सुंदर आहे. ती आपल्या हेअर ड्रेसरच्या नोकरीच्या मानाने जरा जास्तच सुंदर असल्याचं तो सांगतो. याच कारणामुळे त्याने तिला नोकरीच सोडायला सांगितली. आता हे कपल आपला बिझनेस सुरू करण्याचा प्लॅन करत आहे. Alyssa Renee Gutierrez नावाच्या या तरुणीचे टिकटॉकवर 1,78,000 फॉलोअर्स आहेत. तरुणाने गर्लफ्रेंडसाठी केलेलं ते काम पाहून नेटकरी इम्प्रेस; VIDEO तुफान व्हायरल The Sun च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणाऱ्या एलिसाच्या पार्टनरचं नाव पीटर आहे. पीटर या तरुणीपेक्षा ३४ वर्षांनी मोठा आहे. जुलैमध्ये त्यांचा साखरपुडा झाला, तेव्हापासून आपला प्रत्येक दिवस एखाद्या सणाप्रमाणे गेल्याचं ती सांगते. ती सांगते की तिचा प्रियकर तिला एखाद्या राणीप्रमाणेच वागवतो आणि संपूर्ण वर्षभर तिला काही ना काही गिफ्ट देत राहतो. पीटरने आपल्या आधीच्या पत्नीसोबत पंधरा वर्ष संसार केला, यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. पीटरची मुलगी त्याच्या गर्लफ्रेंडपेक्षा काहीच महिने लहान आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात