जाहिरात
मराठी बातम्या / Viral / महिला डान्सरसह शालेय शिक्षकाचे जोरदार ठुमके; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

महिला डान्सरसह शालेय शिक्षकाचे जोरदार ठुमके; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

महिला डान्सरसह शालेय शिक्षकाचे जोरदार ठुमके; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

गणेशोत्सवादरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा प्रकार सुरू होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मध्य प्रदेश, 19 सप्टेंबर : विकासखंड घंसोरमधील गोरखपुर हायर सेकेंडरी शाळेचे शिक्षक रामवीर सिंह सिकरवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Video Viral on Social Media) व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शिक्षकाला सार्वजनिक ठिकाणी एका महिला डान्सरसह (women dancer) ठुमके लावताना पाहण्यात आलं आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिक्षक चर्चेत आला आहे. या प्रकरणात शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनी शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ गणेश उत्सवादरम्यानचा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ गावातील असून येथे गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा शिक्षक रामवीर सिंह महिला डान्सरसह चित्रपटाच्या गाण्यावर नृत्य करीत असल्याचं दिसत होतं. (School teachers dance with female dancers VIDEO goes viral on social media)

हे ही वाचा- VIDEO : मुस्लीम महिला सहकारीला घरी सोडायला जाणाऱ्या हिंदू बँक अधिकाऱ्याला मारहाण हा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. शिक्षण क्षेत्रातील लोक असं कृत्य करू लागले तर मुलं आणि समाजासाठी काय संदेश जाईल. यापूर्वीदेखील रामवीर गोरखपूर शाळेत पदस्थ असताना वादात अडकले होते. वादामुळे त्यांना बगदरी शाळेत पाठविण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर ते पुन्हा गोरखपुरला आले होते. अनेकांनी शिक्षकाच्या या कृत्यावर राग व्यक्त केला आहे. जर शिक्षकच असं वागत असेल तर तो विद्यार्थ्यांना काय शिकवण देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. यापूर्वीदेखील रामवीर दुसऱ्या एका वादात अडकले होते. यानंतर त्यांनी बदलीही करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ गणेशोत्सवादरम्यानचा असल्याचं सांगितलं जात आहे. देशात अद्याप कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार असताना अशा प्रकारे कार्यक्रमांच आयोजन करणे नियमाचं उल्लंघन आहे. त्यामुळे यावरदेखील सवाल उपस्थित केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात