मराठी बातम्या /बातम्या /Viral /पत्नीचा डिझायनर ड्रेस पाहून फिदा झाला पती; मात्र काही वेळातच समोर आलं अजब सत्य

पत्नीचा डिझायनर ड्रेस पाहून फिदा झाला पती; मात्र काही वेळातच समोर आलं अजब सत्य

फोटो क्रेडिट : द सन

फोटो क्रेडिट : द सन

या व्यक्तीला आपल्या पत्नीचा डिझायनर ड्रेस (Designer Dress) भरपूर आवडला आणि त्यानं या ड्रेसचं कौतुकही केलं. मात्र, यानंतर जे समोर आलं ते थक्क करणारं होतं.

नवी दिल्ली 25 सप्टेंबर : प्रत्येक पत्नीला (Wife) पतीनं (Husband) आपल्या ड्रेसचं (Dress) कौतुक केलेलं आवडतं. मात्र, एका कपलसोबत (Couple) एक अजब घटना (Weird Incident) घडली. आता पतीनं सोशल मीडियावर आपल्या पत्नीच्या डिझायनर ड्रेसचा फोटो (Designer Dress Photo) शेअर करत संपूर्ण किस्सा सांगितला आहे. हे वाचून नेटकरीही पोट धरून हसत आहेत.

Yuck! इथे लघवीत उकडून आवडीनं खाल्ली जातात अंडी; सांगितलं अजब कारण

या व्यक्तीला आपल्या पत्नीचा डिझायनर ड्रेस (Designer Dress) भरपूर आवडला आणि त्यानं या ड्रेसचं कौतुकही केलं. मात्र, यानंतर जे समोर आलं ते थक्क करणारं होतं. द सननं दिलेल्या वृत्तानुसार, पतीनं जो फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे, त्यात पत्नीच्या ब्लॅक ड्रेसच्या मागच्या बाजूला तिरकस लाईन दिसते. यात मध्ये मध्ये पांढऱ्या रंगाचं वर्क असल्यासारखं दिसतं. पतीला पत्नीची ही ड्रेसिंग स्टाईल फार आवडली.

काही वेळानं या व्यक्तीला समजलं, की ही ड्रेसिंग स्टाईल नसून त्याच्या मुलानं केलेली उलटी (Vomit) आहे. पतीनं या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, मी माझ्या पत्नीच्या ड्रेसला असलेल्या मागील बाजूच्या डिझाईनचं कौतुक केलं आणि नंतर मला समजलं की ही माझ्याच बाळानं केलेली उलटी (Son's Vomit) होती.

टक्कर होताच उडत्या विमानातून पायलटसह प्रवाशांनी घेतल्या उड्या; Shocking Video

पत्नीनं काहीच वेळापूर्वी बाळाला दूध पाजलं होतं. यानंतर ती बाळाला आपल्या खांद्यावर झोपवत होती. याचवेळी बाळानं उलटी केली. पतीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. लोक या पोस्टवर मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. एका यूजरनं आपल्या पार्टनरला टॅग करत लिहिलं, की असं आपल्यासोबतही होईल का? इतरही अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

First published:

Tags: Bad dressing sense, Viral news