नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : माणसाची माणुसकी दुसऱ्यांना मदत करण्यातूनच दिसून येते. गरजेच्या वेळी दुसऱ्यांच्या कामी येणं, अतिशय महत्त्वाचं असतं. प्रत्येकजण मदतीसाठी नेहमी तयार असतो असं नाही. मात्र, जे दुसऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येतात त्यांच्या मनात प्रेमाची भावना नेहमी असते. नुकतंच एका अशाच व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यातील व्यक्ती एका वृद्ध महिलेचा जीव वाचवताना दिसतो (Man Saves Old Lady).
शेकडो फूट उंचावरील दोरीवर चालत होता, तोल गेला अन्...; थरकाप उडवणारा Video
हा व्हिडिओ फेमस सोशल मीडिया अकाऊंट व्हायरल हॉग्सवरुन शेअर करण्यात आला आहे. हा हैराण करणारा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका युवक रेल्वे रूळ क्रॉस (Old Woman Crossing Railway Track) करणाऱ्या एका वृद्ध महिलेचा जीव वाचवताना दिसतो. यात दिसतं की महिला रूळ ओलांडत आहे आणि दुसऱ्या बाजूने ट्रेन आलेली आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही, मात्र या तरुणाच्या धाडसाचं कौतुक होत आहे.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये दिसतं की रेल्वे रूळावरुन एक ट्रेन कमी वेगात चाललेली आहे आणि तोच रूळ एक वृद्ध महिला पार करत आहे. तितक्यात एका सायकलस्वार युवक तिथे येतो. तो हे दृश्य पाहातो. त्याला जाणवतं की महिला वेळेत हा रूळ पार करू शकणार नाही आणि ट्रेनखाली येऊ शकते. यामुळे तो लगेचच महिलेकडे धाव घेतो आणि अगदी घाईत तिला तिथून बाजूला करतो. ट्रेन निघून गेल्यानंतर तिथे इतरही अनेक लोक जमा होतात.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ आतापर्यंत 28 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. व्हिडिओवर कमेंट करत लोक या व्यक्तीचं कौतुक करत आहेत. एकाने कमेंट करत म्हटलं की हा व्यक्ती हिरो आहे. दुसऱ्या एकाने म्हटलं, हा तरुण अगदी वेळेत तिथे पोहोचला. नाहीतर काहीतर दुर्घटना घडली असती. आणखी एकाने म्हटलं, की जगात आजही चांगले लोक आहेत. एका व्यक्तीने मात्र यावर वेगळीच कमेंट केली आहे. त्याने लिहिलं, की महिलेनं रूळ पार केला असता मात्र हा युवक धावत येत असल्याचं पाहून ती जागेवरच थांबली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.