मुंबई, 14 मे : सध्या उन्हाळा सुरू आहे. उकाड्याने हैराण झालेला लोक थंडाव्यासाठी थंडगार ठिकाणी फिरायला जातात. कुणी समुद्रावर, कुणी हिल स्टेशनवर तर कुणी वॉटरफॉलवर जातात. पण अशा ठिकाणी मजा लुटताना सावधही राहायला हवं. कारण इथं एखादा धोका असू शकतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. वॉटरफॉलखाली मस्त मजा लुटणाऱ्या व्यक्तीवर एक भलामोठा साप कोसळला. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडीओ आहे (Snake fall from waterfall on man). व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती वॉटरफॉलखाली मस्त झोपला आहे. त्याने आपले बहुतेक कपडे काढले आहेत. फक्त शॉर्टवरच ही व्यक्ती आहे. वरून अंगावर कोसळणाऱ्या गार गार पाण्याचा तो मस्त आनंद घेत आहे. इतक्यात पाण्यासह एक भलामोठा सापही तिथं कोसळतो. या व्यक्तीच्या बाजूला हा पडतो. हे वाचा - SO SWEET! या पोपटाचं टॅलेंट पाहून सर्वजण झाले थक्क; एकदा पाहाच हा VIDEO आपल्या बाजूला साप आहे, याची कल्पना या व्यक्तीला बिलकुल नसते. पण त्याचा व्हिडीओ बनवणाऱ्यांनी, शिवाय पाण्याबाहेर तिथं असलेल्यांनी त्या सापाला पाहिलं. सर्वांना घाम फुटला आणि सर्वजण मोठमोठ्याने ओरडू लागले. साप साप साप ओरडत त्या व्यक्तीचं लक्ष त्या सापाकडे खेचू लागले. त्याला पाण्यात त्याच्या बाजूला साप असल्याचं सांगू लागले, खुणावू लागले.
व्यक्तीलाही थोडावेळ काहीच समजलं नाही. तो पटकन उठून बसला आणि लोकांनी सांगितल्याप्रमाणे त्याने आपल्या बाजूला पाहिलं. तो साप त्या व्यक्तीच्याच दिशेने जाताना दिसला. सापाला पाहून व्यक्तीही घाबरली. आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागली. व्हिडीओच्या शेवटी ती एका कोपऱ्यात बसलेली दिसते. या पुढे काय झालं ते नेमकं माहिती नाही. सुदैवाने ही व्यक्ती सापापासून बचावली असावी, साप तिला चावला नसावा इतकीच अपेक्षा. हे वाचा - वॉटरपार्कमध्ये भयंकर अपघात, स्लाईड तुटल्याने अनेक जण जखमी; VIDEO व्हायरल हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. कुणाला व्हिडीओ पाहून धडकी भरली आहे तर कुणी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. हा व्हिडीओ तसा मजेशीर वाटत असला तरी अशा ठिकाणी आपण सावध राहायला हवं हे हा व्हिडीओ पाहून आपल्या लक्षात आलंच असेल.