इंडोनेशिया, 13 मे : अपघात
(Accident) कधीही होऊ शकतो. यासाठी कुणी आधीपासून तयार नसतो. जेव्हा व्यक्तीला अपेक्षाही नसते तेव्हा विचारही केला नसेल, अशा घटना घडतात. इंडोनेशियातील केनपार्क वॉटरपार्कमध्ये
(Accident in Waterpark Indonesia) अशाच झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
(Waterpark Video Viral) होत आहे.
व्हीडिओ मोठ्या प्रमाणात होतोय शेअर -
अचानक तुटलेल्या स्लाईडचा अपघात या व्हीडिओत कैद झाला. जेव्हा ही स्लाइड तुटली तेव्हा लोक वॉटर पार्कमध्ये आनंद घेत होते आणि पाहताच अचानक 16 लोक वेगाने खाली पडू लागले. ही घटना 7 मेची असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताचा हा व्हीडिओ खूप मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
इंडोनेशियन मीडिया अंतराने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात सुमारे 16 जण जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी ते अनेक मीटरवरून घसरून खाली येत होते. पण तेव्हाच स्लाईड तुटली आणि लोक खाली पडायला लागले. हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत तसेच सर्वांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
वॉटर पार्क व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह -
फेसबुकवर NOODOU नावाच्या एका पेजवर या व्हिडिओला शेअर करण्यात आले आहे. यात लोक खाली पडत असल्याचे दिसत आहे. स्लाईडच्या बाजूला पडलेला तडा हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. स्लाइड ओव्हरलोड झाल्यामुळे स्लाइड तुटली आणि सर्वजण खाली पडले. यासोबतच वॉटर पार्कमधील देखभालीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. नऊ महिन्यांपूर्वी येथे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर येथील स्लाइड्सची एकदाही दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळेच हा अपघात झाला.
हेही वाचा - Thane CCTV: वर्दीतील देवमाणूस! स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा LIVE VIDEO
उपमहापौरांनी दिले हे आदेश -
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपमहापौर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासोबतच पुन्हा असे काही घडू नये यासाठी इतर वॉटर पार्कमध्येही तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अशा निष्काळजीपणामुळे जीवही धोक्यात येऊ शकतो, त्यामुळे पार्क व्यवस्थापनाला काळजी घेण्याचे आदेश दिले. सध्या हा भितीदायक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.