नवी दिल्ली 30 जानेवारी : ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. मात्र, अनेकदा याचा प्रत्यय देणाऱ्या काही घटनाही आपल्याला पाहायला मिळतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Road Accident Video) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजेल की माणूस मृत्यूच्या तोंडातून परत कसा येतो. तुम्ही अनेकदा अपघाताच्या बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. मात्र, सध्या जो व्हिडिओ समोर आला आहे, तो पाहून काही वेळासाठी तुमच्या काळजाचा ठोकाही चुकेल.
हाताने किंग कोबराला पकडू लागला व्यक्ती; मागे वळून सापाने केला हल्ला पण.., VIDEO
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पाऊस सुरू आहे आणि रस्त्यावर गाड्या अगदी वेगात जात आहे. रस्ता निसरडा असल्याने एक दुचाकीस्वार अचानक घसरून रस्त्यावर पडतो. इतक्यात पाठीमागून एक मोठा ट्रक येतो. ट्रक इतका वेगात असतो की तो या व्यक्तीला अगदी जोरात धडक देणारच असतो, इतक्यात हा व्यक्ती उठून बाजूला धावतो. फिल्मी अंदाजात या व्यक्तीने स्वतःला मृत्यूच्या दारातून परत आणलं. मागून येणारा ट्रक पाहताच हा व्यक्ती क्षणाचाही विलंब न करता उठून बाजूला धावतो आणि स्वतःचा जीव वाचवतो.
सुरुवातीला असं वाटतं की हा व्यक्ती ट्रकच्या धडकेपासून स्वतःला वाचवू शकणार नाही. मात्र, नशिबही त्याची साथ देतं आणि तो मृत्यूच्या दारातून परत येतो. आणखी एक विशेष बाब म्हणजे इतक्या भयंकर घटनेत त्याला अजिबातही दुखापत झाली नाही.
VIDEO: महिलेच्या अंगावर चिंपांझीने घेतली उडी; पुढे जे केलं ते पाहून नेटकरी शॉक
21 सेकंदाच्या या व्हिडिओ क्लिपबद्दल सांगितलं जात आहे, की ही घटना 24 जानेवारीची असून यात कोणीही जखमी झालं नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर ViralHog नावाच्या पेजवरुन शेअऱ करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, हा व्यक्ती खूप नशिबवान होता, की त्याला ट्रकचा धक्काही लागला नाही. दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलं, देव त्याच्यासोबत आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 1 लाखहून अधिकांनी पाहिला आहे.