Home /News /viral /

VIDEO: धावत येत महिलेच्या अंगावर चिंपांझीने घेतली उडी अन्...; पुढे जे केलं ते पाहून नेटकरी शॉक

VIDEO: धावत येत महिलेच्या अंगावर चिंपांझीने घेतली उडी अन्...; पुढे जे केलं ते पाहून नेटकरी शॉक

व्हिडिओमध्ये एक चिंपांझी बऱ्याच काळानंतर आपल्या ओळखीच्या महिलेला भेटतो. यानंतर चिंपांझी धावत जात या महिलेला मिठी मारतो (Chimpanzee gave Tight Hug to Woman).

  नवी दिल्ली 29 जानेवारी : सोशल मीडियावर सतत प्राण्यांचे काही ना काही नवे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. वाईल्डलाइफबद्दल (Wildlife Videos) बोलायचं झाल्यास, चिंपांझीचा व्हिडिओ कंटेट नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतो. कारण यांचं कृत्य बऱ्याच प्रमाणात माणसांप्रमाणेच असतं. याच कारणामुळे सोशल मीडियावर चिंपांझीचा एखादा व्हिडिओ (Chimpanzee Cute Viral Video) अपलोड होताच व्हायरल होतो. सध्या चिंपांझीचा असाच एक अतिशय क्यूट व्हिडिओ समोर आला आहे. जो तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल. 'कृपया लक्ष द्या...'; लग्नाआधी सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत नवरीने दिली Warning हा व्हिडिओ पाहून तुम्हाला वाटेल, की प्राण्यांमध्येही माणसांप्रमाणेच भावना असतात. व्हिडिओमध्ये एक चिंपांझी बऱ्याच काळानंतर आपल्या ओळखीच्या महिलेला भेटतो. यानंतर चिंपांझी धावत जात या महिलेला मिठी मारतो (Chimpanzee gave Tight Hug to Woman). हा व्हिडिओ नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन लोकांनी चिंपांझीला पकडलं आहे. ते जेव्हा त्याला सोडतात तेव्हा चिंपांझी धावत जातो आणि महिलेच्या अंगावर उडी घेत तिला मिठी मारतो.
  हे दृश्य पाहून नेटकरीही भावुक झाले. हा चिंपांझी महिलेला ओळखत होता. मात्र खूप दिवसांनंतर महिलेला भेटल्यानं त्याला राहावलं नाही आणि धावत जात त्याने महिलेला मिठी मारली. महिला आणि चिंपांझीचा हा क्यूट व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर safarigallery नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यूजरने व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं, मनाला स्पर्शून जाणारी भेट. यासोबतच अॅडमिनने माहिती देत सांगितलं की काही चिंपांझींना एएसएलसारखी मानवीय भाषा शिकवली जाते. वाशो नावाची एक मादा चिंपांझी 240 हून अधिका साईन लँग्वेज ओळखायची. VIDEO - 3 चोरांची फजिती! इतकी धडपड केली तरी तिघं मिळून पळवू शकले नाहीत एक टीव्ही इन्स्टाग्रामवर एका दिवसाआधी अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 12 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. काहींना हे निस्वार्थी प्रेम वाटलं तर काही लोक हे पाहून भावुक झाले.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Emotional, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या