Home /News /viral /

हाताने किंग कोबराला पकडू लागला व्यक्ती; मागे वळून सापाने केला हल्ला पण.., अंगावर शहारे आणणारा VIDEO

हाताने किंग कोबराला पकडू लागला व्यक्ती; मागे वळून सापाने केला हल्ला पण.., अंगावर शहारे आणणारा VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कोबरा सापाला पकडण्यास अपयशी होत असल्याचं दिसतं. या प्रयत्नात एकदा तर साप आपला जबडा उघडून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही करतो.

  नवी दिल्ली 29 जानेवारी : सापाचं नाव ऐकताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. कारण सापाने चावा घेतल्यास अनेकदा मृत्यूही होतो. याच कारणामुळे माणसांसोबतच मोठमोठे प्राणीही साप दिसताच आपला रस्ता बदलतात. सापाचे व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड होताच व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये (Shocking Video of King Cobra) एका व्यक्तीने विशालकाय कोबरा सापच हातामध्ये पकडल्याचं दिसतं. यानंतर जे काही घडलं, ते पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. हा व्हिडिओ (Snake Video) पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. VIDEO: महिलेच्या अंगावर चिंपांझीने घेतली उडी; पुढे जे केलं ते पाहून नेटकरी शॉक अनेकांनी हा वेडेपणा असल्याचं म्हटलं आहे तर अनेकांनी साप कधीच माणसाचा मित्र होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कोबरा सापाला पकडण्यास अपयशी होत असल्याचं दिसतं. या प्रयत्नात एकदा तर साप आपला जबडा उघडून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही करतो. मात्र, हा तरुण लगेचच दूर धावण्यात यशस्वी ठरतो. स्थानिक रिपोर्टनुसार, साप पकडणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की किंग कोबराला पकडल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलं. किंग कोबरा हा जगातील सर्वाधिक लांब विषारी साप आहे. याची लांबी सहसा 10 ते 13 फूटापर्यंत असते. मात्र, थायलँडमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा 18 फूट आणि 4 इंच लांब कोबरा पकडला गेला होता. इथे मोठ्या प्रमाणात साप आढळतात. अशात इतक्या विषारी सापाला हाताने पकडतानाचा तरुणाचा हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

  'घरात घुसू नकोस...', चक्क सापालाच शेतकऱ्याने धमकावलं; पुढे जे घडलं ते शॉकिंग

  हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर शेअर केला गेला आहे. लोक हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मही शेअर करत आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावरही काटा येत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: King cobra, Snake video

  पुढील बातम्या