नवी दिल्ली 02 फेब्रुवारी : धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक (Smoking is Injurious to Health) आहे, ही ओळ सिगारेटच्या पॅकेटवरच लिहिलेली असते. धुम्रपान करणारे लोक ही ओळ वाचतातही. मात्र, तरीही याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. एखादा जीवघेणा आजार किंवा आपल्या चुकीची जाणीव होत नाही, तोपर्यंत हे लोक धुम्रपान करतच राहतात. एका व्यक्तीसोबत असंच घडलं. त्याला समजलं की आपल्या एकटेपणाचं कारण सिगरेटच आहे (Man Lost Everything Because of Smoking), त्यामुळे त्याने स्मोकींग बंद केलं आणि मग तो लखपती बनला.
भलामोठा दगड खाली कोसळला अन्...; गिर्यारोहकासोबत घडलेल्या घटनेचा Shocking Video
एकेकाळी अगदी कंगाल झालेला हा व्यक्ती आज लखपती झाला आहे. मागील ३ वर्षात त्याने १७ लाखहून अधिक पैसे जमवले असून आपला बँक बॅलन्सही चांगला केला आहे. आधी लोक त्याला बिनकामाचा आणि सिगरेटच्या आधीन गेलेला व्यक्ती म्हणून पाहात होते. मात्र आज त्याने आपली इमेज चांगली करण्यासोबतच सम्मानही मिळवला आहे.
या व्यक्तीने अवघ्या तेरा वर्षाच्या वयात स्मोकींग करण्यास सुरुवात केली होती. जेव्हा त्याने हे व्यसन सोडलं, तेव्हा हे व्यसन सुरू करून त्याला जवळपास २० वर्ष झाली होती. शाळेत असताना स्वतःपेक्षा मोठ्या मुलांसोबत राहिल्यामुळे त्याला हे व्यसन लागलं होतं. हळूहळू यासाठी तो शाळेतही जाणं बंद करू लागला. संपूर्ण दिवस बाहेर फिरून तो नशेतच घरी परतत असे. पालक अनेकदा त्याला ओरडत असत. मात्र, वाद जास्त वाढल्याने वयाच्या सोळाव्या वर्षीच त्याने आपलं घर सोडलं. सहा आठवडे तो लंडनच्या रस्त्यांवर राहिला. आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर त्याने वडिलांची माफी मागितली. वडिलांनी त्याला ग्लासगोचं वनवे तिकीट दिलं आणि तिथेच नोकरी मिळवून दिली. अनेक वर्षांनी 2011 मध्ये त्याचं ब्रेकअप झालं, तेव्हा तो दोन मुलांचा पिता होता. मात्र, तो पुन्हा एकटा आणि बेघर झाला.
फेव्हिकॉल की दारू, बाँडिंगसाठी काय उत्तम? हर्ष गोयंकांना पडला प्रश्न; उत्तर काय?
यानंतर त्याला कल्पना आली की या सगळ्या अडचणी केवळ सिगारेटमुळे येत आहेत. कमी वयातच त्याने शाळा, घर, पालक सगळं सोडलं होतं. काही काम करण्याऐवजी तो नशेतच राहात असे. २०१८ साली अखेर त्याने स्मोकींग बंद करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्याची ही सवय पूर्णपणे सुटली. आता त्याला दुसरं कोणी स्मोकींग करताना पाहायलाही आवडत नाही. सिगरेट सोडल्यामुळे त्याचे भरपूर पैसेही वाचू लागले. सिगरेट सोडल्यानंतर तीन वर्षातच त्याने 17 लाखाहून अधिका रुपये वाचवले आहेत. सोबतच आपल्या आरोग्यासोबतचा खेळही बंद झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.