जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पर्वतावरुन भलामोठा दगड खाली कोसळला अन्...; गिर्यारोहकासोबत घडलेल्या भीषण घटनेचा Shocking Video

पर्वतावरुन भलामोठा दगड खाली कोसळला अन्...; गिर्यारोहकासोबत घडलेल्या भीषण घटनेचा Shocking Video

पर्वतावरुन भलामोठा दगड खाली कोसळला अन्...; गिर्यारोहकासोबत घडलेल्या भीषण घटनेचा Shocking Video

आयुष्य किती क्षणभंगुर आहे हे या घटना शिकवतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 02 फेब्रुवारी : गिर्यारोहक जेव्हा एखाद्या ठिकाणी निघतो तेव्हा त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गिर्यारोहकाला केवळ पर्वतच चढावा लागत नाही, तर त्याला अनेकवेळा मृत्यूलाही सामोरे जावे लागतं. कडाक्याच्या थंडीत त्यांना शेकडो आव्हानं स्वीकारत पुढे जात राहावं लागतं. सावधगिरी बाळगली नसती किंवा नशीब चांगलं नसतं तर त्याचा मृत्यू झाला असता, अशी वाक्य गिर्यारोहकांच्या बाबतीत तुम्ही अनेकवेळा ऐकली असतील. सध्या एका अशाच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. यात दिसतं की मृत्यू गिर्यारोहकाच्या अगदी जवळून गेला (Video of Mountaineer). GF ने असा फोटो पाठवला की थेट पोलिसात गेला BF; सत्य समजताच पुरता हादरला गिर्यारोहकाला पर्वत चढताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. यात कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू कसा, केव्हा आणि कुठे होईल हे कोणालाच माहीत नसलं तरी मृत्यू समोर दिसतो तेव्हा लोक जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. आयुष्य किती क्षणभंगुर आहे हे या घटना शिकवतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याला ‘फ्लाइंग किस ऑफ डेथ’ असं म्हटलं जात आहे.

जाहिरात

हा व्हिडिओ itshimalayas नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये काही गिर्यारोहक पाकिस्तानातील स्पँटिकमधील 7,000 फूट उंच पर्वतावर चढत होते. एका महाकाय खडकाखाली तंबू टाकून ते विश्रांती घेत होते. काही वेळाने वरचे मोठे खडक उंचावरून खाली पडू लागले. तिथे उपस्थित काही लोकांना याची माहितीही नव्हती आणि ते आपापल्या कामात व्यस्त होतं.

बापरे! मजेत तरुणाने सिंहाच्या पिंजऱ्यात हात टाकला आणि…; थरकाप उडवणारा VIDEO

यादरम्यान एक अतिशय मोठा दगड तंबूच्या काठाजवळून गेला. तिथे दोन जण उपस्थित होते. एकजण ताबडतोब तिथून पळून गेला. मात्र दुसऱ्या व्यक्तीच्या अगदी जवळून हा भलामोठा दगड गेला. हा व्यक्ती एक पाऊलही पुढे गेला असता तर त्याचा मृत्यू झाला असता. हा व्यक्ती अगदी मृत्यूच्या दारातूनच परत आला. देव तारी त्याला कोण मारी, या वाक्याचा प्रत्यय देणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात