लंडन 13 जुलै: आपल्या शेजाऱ्याचा जीव वाचवल्यामुळे ज्या व्यक्तीला हिरो समजलं जात होतं, तोच खरंतर विलन (Villain) असल्याचं समोर आलं आहे. रॉबर्ट बार्नेट (Robert Barnett) नावाच्या व्यक्तीनं आधी एका घराला आग लागलेली असताना या आगीतून महिलेला बाहेर काढलं. यादरम्यान तो स्वतःही जखमी झाला. या कामासाठी बार्नेटचं भरपूर कौतुक झालं. लोकांनी त्याला रिअल लाईफ हिरोही (Real Life Hero) घोषित केलं. मात्र, आता या कथेत वेगळाच ट्विस्ट आला आहे.
मिररमध्ये आलेल्या वृत्तानुसार, उत्तर पूर्ण इंग्लंडमधील (England) Sunderland मध्ये राहणाऱ्या रॉबर्ट बार्नेट याला न्यायालयानं तुरुंगात पाठवलं आहे. त्यानं पोलीस तपासात स्वतः आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यानं म्हटलं, की त्यानंच शेजारी राहणाऱ्या सेरेना ब्यूरेलच्या घरात आग लावली होती. मात्र, त्याला हे माहिती नव्हतं की त्यावेळी सेरेना घरीच आहे, त्याला घरात कोणीच नाही असं वाटलं होतं.
पोलिसांनी न्यायालयात सांगितलं, की सेरेना जेव्हा झोपेतून उठल्या तेव्हा त्यांनी पाहिलं, की घरात सगळीकडे धूर आहे. त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र आगीनं त्यांचा रस्ता अडवला. त्यांनी अग्निशामक दलाला अनेक फोन केले. सेरेनानं मदतीसाठी एक फोन आपला शेजारी रॉबर्ट यालाही केला. यावेळी रॉबर्टला समजलं की त्यानं किती मोठी चूक केली आहे आणि लगेचच तो मदतीसाठी पोहोचला.
एकटी मुलगी पाहून घरात शिरला अन्...; 3 तासांनी आरोपीनं गळफास घेत संपवलं जीवन
पीडिता आणि आरोपीच्या घराच्या जवळ राहणाऱ्या एका महिलेनं सांगितलं, की रॉबर्टनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बराच वेळ सेरेनाच्या घरात तिला वाचण्यासाठी घुसण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात रॉबर्ट स्वतःही जखमी झाला. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचताच रॉबर्टनं आग लागल्याचं समजताच आपण धावत आल्याचं सांगून पोलिसांसमोर स्वतःला हिरो घोषित केलं.
दोन महिन्यातच संसार उद्धवस्त; सकाळी फिरायला गेली अन् पाचव्या दिवशी आढळला मृतदेह
या कामासाठी रॉबर्टचं भरपूर कौतुक झालं. मात्र, नंतर हाच हिरो विलन असल्याचं समोर आलं. घटनेनंतर पोलिसांनी आसपास लावण्यात आलेले कॅमेरे तपासले तेव्हा त्यांना सेरेनाच्या घराजवळ एक व्यक्ती दिसला. पोलिसांनी दिसलं, की हा व्यक्ती तिथून जाताच तिच्या घरी आग लागली. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी रॉबर्टच्या घरात तपासणी केली असता याठिकाणी तेच कपडे मिळाले जे कॅमेऱ्या दिसणाऱ्या व्यक्तीनं घातले होते. याच आधारे रॉबर्टला ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला त्यानं आपल्याला काहीही माहिती नसल्याचं दाखवलं. मात्र, नंतर त्यानं आपला गुन्हा मान्य केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Viral news