नवी दिल्ली 04 जून : लोकांना साहसी काहीतरी करून दाखवण्याची खूप आवड असते. याच नादात अनेकजण अतिशय दुर्गम ठिकाणी पोहोचतात आणि बऱ्याचदा नको त्या संकटात अडकतात. या परिस्थितीत ते स्वतःच्याच अडचणी वाढवतात. अलीकडेच अशीच एक घटना पाहायला मिळाली. यात एक व्यक्ती जंगली भागात पोहोचला आणि त्याने पायातील बूट काढून पुढे जाण्याचे ठरवले. मात्र पुढे काय होणार आहे याची त्याला कल्पनाही नव्हती (Man fell in mud). लग्नात वहिनी-दीरावर खिळल्या सर्वांच्या नजरा; असं काही केलं की तुफान व्हायरल होतोय हा VIDEO @cctv_idiots या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ रिट्विट करण्यात आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याला वाटलं की तो चिखलावरुन सहज चालत जाईल आणि त्याने तयारी केली पण पुढे पाऊल टाकताच त्याच्यासोबत भलतंच घडलं. हा व्हिडिओ Ladbible ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला होता, जो या पेजद्वारे रिट्विट करण्यात आला आहे.
Don’t get that T-shirt dirty 😂 pic.twitter.com/6SezLiniCk
— CCTV_IDIOTS (@cctv_idiots) June 3, 2022
व्हिडिओमध्ये (Viral Video) एक व्यक्ती हाफ शर्ट, पँट, टोपी घातलेला दिसत आहे. तो जंगली भागात उपस्थित असल्याचं दिसतं. त्याच्या वाटेत खूप चिखल आहे, त्यामुळे तो बूट काढून अनवाणी जाण्याचा बेत आखतो. असं दिसतं की त्याने समोरच्या जमिनीबाबत चुकीचा अंदाज लावला आणि ती पार करण्यासाठी त्याने अनवाणी चालायला सुरुवात केली. पण ही त्याची सर्वात मोठी चूक होती. त्या व्यक्तीने एक पाऊल पुढे टाकताच तो संपूर्ण जमिनीत गढून गेला. खरं तर, ती ओल्या मातीने भरलेली दलदलीसारखी जमीन होती. OMG! रस्त्यावर मृतावस्थेत पडलेला श्वान फक्त हात लावताच जिवंत झाला; व्यक्तीने कसा केला चमत्कार पाहा VIDEO या व्हिडिओला 8 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर दोन्ही ट्विटर अकाउंटवर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ जाणूनबुजून बनवण्यात आल्याचं एका व्यक्तीने म्हटलं आहे. एकाने म्हटलं की, हा व्हिडिओ पाहून त्याला हसू आवरता येत नाहीये. तर आणखी एकाने कमेंट करत म्हटलं की, हा व्हिडिओ पाहून असं वाटतंय जणू कोणीतरी पाण्यात उडी घेत आहे. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

)







