मराठी बातम्या /बातम्या /Viral /

काळ आला होता पण...; रस्त्यावर उभा असतानाच अंगावर आली भरधाव ट्रक, VIDEO चा शेवट थक्क करणारा

काळ आला होता पण...; रस्त्यावर उभा असतानाच अंगावर आली भरधाव ट्रक, VIDEO चा शेवट थक्क करणारा

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस रस्त्याच्या कडेला आरामात उभा आहे, इतक्यात एका ट्रकने त्याला पाठीमागून धडक दिली. हा ट्रक झाडाच्या फांदीला आदळला आणि असंतुलित झाला

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस रस्त्याच्या कडेला आरामात उभा आहे, इतक्यात एका ट्रकने त्याला पाठीमागून धडक दिली. हा ट्रक झाडाच्या फांदीला आदळला आणि असंतुलित झाला

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस रस्त्याच्या कडेला आरामात उभा आहे, इतक्यात एका ट्रकने त्याला पाठीमागून धडक दिली. हा ट्रक झाडाच्या फांदीला आदळला आणि असंतुलित झाला

  नवी दिल्ली 11 जून : आज हजारो-लाखो वाहने रस्त्यावर धावत आहेत, अशा परिस्थितीत सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही पायी चालत असाल किंवा गाडीने कुठे जात असाल तरी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. अन्यथा कोण कधी किंवा कुठे अपघाताला बळी पडेल हे कोणालाच माहीत नाही. भरधाव वेगामुळे अनेकदा रस्त्यावर अपघात होत असले तरी काहीवेळा इतरांच्या चुकांमुळेही काहींना विनाकारण मोठ्या संकटाला सामोरे जावं लागतं. चंद्रावर जाऊन Moon Walk करू शकले नाहीत Astronauts!, NASA चा Video Viral अनेकवेळा लोक रस्त्याच्या कडेला उभे राहिलेले असताना दुसऱ्याच्या चुकीमुळे त्यांचा अपघात झाल्याचं पाहायला मिळतं. तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये लोक नकळतपणे रस्ते अपघाताचे बळी ठरतात. सध्या अशाच एका अपघाताचा हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल (Shocking Road Accident Video) होत आहे, जो पाहून तुम्हाला हॉलिवूडच्या फायनल डेस्टिनेशन चित्रपटाची आठवण नक्कीच होईल.
  View this post on Instagram

  A post shared by ViralHog (@viralhog)

  फायनल डेस्टिनेशनमध्ये ज्या प्रकारे रस्ते अपघात दाखवले जातात, तशाच प्रकारचं दृश्य या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. या अपघातात कोणीही जखमी झालं नसलं तरी वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस रस्त्याच्या कडेला आरामात उभा आहे, इतक्यात एका ट्रकने त्याला पाठीमागून धडक दिली. हा ट्रक झाडाच्या फांदीला आदळला आणि असंतुलित झाला. सुदैवाने रस्त्याच्या कडेला असलेला तरुणही वेळीच सावध झाला आणि सतर्कता दाखवत लगेचच तिथून सरकला. अन्यथा ज्याप्रकारे हा अपघात झाला, तो पाहता हा तरुण गंभीर जखमी होऊ शकत होता. स्विमिंग पुलमध्ये स्टंट करताना भयंकर दुर्घटना; तोल जाताच डोक्यावर पडला, धक्कादायक VIDEO हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरलहॉग नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ही घटना काहीशी 'फायनल डेस्टिनेशन'सारखी आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 93 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर हजारो लोकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, 'अविश्वसनीय!!! त्याची वेळ अजून आली नव्हती! देवाने या माणसाला वाचवले'. तर आणखी एका यूजरने लिहिलं, एकाचवेळी हा व्यक्ती दुर्भाग्यवान आणि भाग्यशालीही ठरला.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Road accident, Shocking video viral

  पुढील बातम्या