मराठी बातम्या /बातम्या /Viral /चंद्रावर जाऊन Moon Walk करू शकले नाहीत Astronauts!, NASA चा Video Viral

चंद्रावर जाऊन Moon Walk करू शकले नाहीत Astronauts!, NASA चा Video Viral

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जेव्हा अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवलं तेव्हा त्यांचे पाय थरथर कापत होते.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जेव्हा अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवलं तेव्हा त्यांचे पाय थरथर कापत होते.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जेव्हा अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवलं तेव्हा त्यांचे पाय थरथर कापत होते.

नवी दिल्ली, 10 जून: दिवंगत पॉपस्टार मायकेल जॅक्सन आपल्या 'मूनवॉक'साठी (Moon Walk) अजूनही प्रसिद्ध आहे. आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तो स्टेजवर आपली ही हूकस्टेप करत असे. त्याच्यामुळे संपूर्ण जगाला मूनवॉक ही संकल्पना माहिती झाली. पण तुम्हाला माहिती आहे का, खऱ्याखुऱ्या चंद्रावर पाऊल ठेवूनही अंतराळवीरांना (Astronauts) तिथे मूनवॉक करणं शक्य झालेलं नाही. 1972मध्ये चंद्रावर शेवटचं लँडिंग झालं होतं. 12 दिवसांच्या अपोलो 17 या (Apollo 17 Mission) मोहिमेत, अंतराळवीरांनी तेथील पृष्ठभागाचं परीक्षण करून जमिनीचे नमुने परत आणले. मात्र हे सर्व करताना त्यांना तिथं नीट पाऊलही ठेवता आलं नव्हतं, असा दावा केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जेव्हा अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवलं तेव्हा त्यांचे पाय थरथर कापत होते. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

@konstructivizm नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. ज्यामध्ये असं दिसत आहे की, अंतराळवीर त्यांच्या स्पेस सूटमध्ये चंद्रावर चालत आहेत. काहीवेळा पाय अडकल्यामुळे ते खालीही पडले आहेत. वंडर ऑफ सायन्सच्या मते, आयएसएसच्या बाहेर असलेल्या निकेल-हायड्रोजन बॅटरीच्या जागी नवीन लिथियम-आयन बॅटरी लावण्यासाठी 21 जुलै 2020 रोजी केलेल्या स्पेसवॉकदरम्यान हा व्हिडिओ कॅप्चर करण्यात आला होता.

'NASA bloopers व्हिडिओ ज्यामध्ये अनेक अंतराळवीर चंद्रावर चालताना पडत आहेत,' असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. ट्विटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत तीन लाख 50 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्सनी तो शेअरही केला आहे आणि त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर दिवंगत गायक मायकेल जॅक्सनच्या प्रसिद्ध डान्स स्टेप 'मूनवॉक'शी या व्हिडिओची तुलना केली आहे. एका यूजरने कमेंट केली आहे की, 'जेव्हा तुम्हाला मूनवॉक कसा करायचा हे माहीत नसतं तेव्हा असं होतं.' आणखी एका युजरने अंतराळवीरांच्या स्पेस सूटचा संदर्भ देत लिहिलंय की, 'अंतराळवीर विचार करत असतील की मून वॉक करताना माझा सूट फाटू नये.'

डेटिंग App व्दारे संपर्कात आली अन्...; 5 स्टार हॉटेलमध्ये महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ शेअर केला होता. जो प्रचंड व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (ISS) काम करताना एक अंतराळवीर अंतराळात उडताना दिसत होता. 'हे बघून मी खूप मंत्रमुग्ध झालो. अक्षरशः एखादा आउट-ऑफ-द-वर्ल्ड बॅले बघितल्यासारखं वाटत आहे. या अंतराळवीराची नोकरी जितकी महत्त्वाची आणि रोमांचक असेल तितकीच माझी नोकरी #MondayMotivation आहे. असं मनात ठेवून मला माझ्या आठवड्याची सुरुवात करायची आहे,' असं कॅप्शन देऊन महिंद्रांनी तो व्हिडिओ शेअर केला होता.

First published:

Tags: Live video, Nasa