Home /News /viral /

स्विमिंग पुलमध्ये स्टंट करताना भयंकर दुर्घटना; तोल जाताच डोक्यावर पडला, धक्कादायक VIDEO

स्विमिंग पुलमध्ये स्टंट करताना भयंकर दुर्घटना; तोल जाताच डोक्यावर पडला, धक्कादायक VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन मुलं स्विमिंग पूलजवळ प्लॅटफॉर्मवर उभा आहेत. यानंतर यातील एक व्यक्ती दुसऱ्याला त्याच्या खांद्यावर उभा राहण्यास मदत करतो.

    नवी दिल्ली 10 जून : आजच्या युगात सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे प्रत्येकाला लोकप्रिय व्हायचं आहे. पण या नादात काही लोक असं काम करतात, ज्यामुळे ते आपला जीवही धोक्यात घालतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात स्विमिंग पूलमध्ये स्टंट करणं एका मुलाला चांगलंच महागात पडल्याचं दिसतं. व्हायरल क्लिपमध्ये दोन मुलं स्विमिंग पूलमध्ये स्टंट करताना दिसत आहेत (Stunt in Swimming Pool). एकाच्या खांद्यावर उभं राहून दुसरा पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न करतो, पण पुढच्याच क्षणी काय होतं ते पाहून तुम्हालाही त्या व्यक्तीची कीव येईल. पाळीव श्वानांना वाचवण्यासाठी जंगली अस्वलासोबत भिडली महिला; थरारक घटनेचा VIDEO व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन मुलं स्विमिंग पूलजवळ प्लॅटफॉर्मवर उभा आहेत. यानंतर यातील एक व्यक्ती दुसऱ्याला त्याच्या खांद्यावर उभा राहण्यास मदत करतो. हे पाहून जाणवतं की वरती चढणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याच्या खांद्यावरुन उंचावरून पूलामध्ये उडी मारायची आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ हृदयाचा ठोका चुकवणारा. हा स्टंट करत असताना आपल्यासोबत पुढच्याच क्षणी काय घडणार आहे, याची कल्पनाही उडी मारणाऱ्या व्यक्तीला नव्हती. मुलाने खांद्यावर चढून उडी मारण्याचा प्रयत्न करताच तो थेट प्लॅटफॉर्मवर मानेवर पडला. व्हिडिओ पाहून अंदाज येतो की लाकडी प्लॅटफॉर्मवर पडल्याने या व्यक्तीला किती दुखापत झाली असावी. व्हिडिओ इथेच संपतो. या मुलाची प्रकृती कशी आहे, त्याला जास्त दुखापत झाली का, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांनाच त्याची काळजी वाटू लागली आहे. OMG! बड्या बॉक्सरला चिमुकल्याने एका बुक्कीतच केलं गार; पाहा जबरदस्त Boxing video ट्विटरवर शेअर केलेला 8 सेकंदाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एका दिवसापूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ४६ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर व्हिडिओवर अनेकांनी निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलं, लाकडी बोर्ड देखील लवचिक नव्हता. या व्यक्तीला भरपूर मार लागला असेल. आणखी एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, या प्रकारच्या दुखापतीमुळे व्यक्तीला अर्धांगवायूदेखील होऊ शकतो. दुसर्‍या युजरने लिहिलं की, बहुतेक त्याची मान मोडली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking video viral, Stunt video

    पुढील बातम्या