बिबट्या जंगलातून बाहेर येऊन एका घरात घुसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. स्विमिंग पूलच्या बाजूला उभ्या असलेल्या एका माणसाला पाहून तो त्याला आपलं लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न करतो. बिबट्या माणसावर जीवघेणा हल्ला करतो. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हा व्यक्ती खूप घाबरतो. मात्र, तो हार मानत नाही. यानंतर तो बिबट्याचा सामना करतो. बापरे! चक्क चित्त्यालाच किस करायला गेली तरुणी आणि...; Shocking आहे Video चा शेवट तुम्हाला दिसेल की हा व्यक्ती काठी उचलतो आणि बिबट्याचा सामना करायला लागतो. यामुळे बिबट्या काही वेळ व्यक्तीची शिकार करण्याचा प्रयत्न करतो, मात्र नंतर तिथून पळून जातो. हा व्यक्ती ज्या पद्धतीने बिबट्याचा धैर्याने सामना करतो, ते अत्यंत धाडसी कृत्य आहे. त्याचा हा कारनामा पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. Animals_powers नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Leopard, Shocking video viral