Home /News /viral /

Video: लग्नात वधूनं दिला धक्का, पण पाण्यात पडणारा नवरदेवही काही कमी करामती नव्हता

Video: लग्नात वधूनं दिला धक्का, पण पाण्यात पडणारा नवरदेवही काही कमी करामती नव्हता

लग्नाचा हा मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्रामवर theadorableweddings पेजवरून शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. जवळपास 10 लाख लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे.

  मुंबई, 13 मे : सोशल मीडियावर अनेकदा लग्नाचे व्हिडिओ व्हायरल (wedding video viral) होतात. काही व्हिडिओमध्ये वराचे मित्र मस्करी करताना दिसतात, तर काही व्हिडिओमध्ये वधूचा डान्स व्हायरल होतो. पण, यावेळी व्हायरल होत असलेला लग्नाचा व्हिडिओ खूपच वेगळा आहे. या व्हिडिओमध्ये एक वधू आपल्या वराला पाण्यात ढकलताना दिसत (bride groom funny video) आहे. मात्र, ती कोणत्याही नदी किंवा तलावात नाही तर स्विमिंग पूलमध्ये (bride pushes groom into swimming pool) ढकलते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर आपल्या वधूचा एकदा धरलेला हात सोडत नाही, ज्यामुळे ती देखील पाण्यात पडते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर एकाच ठिकाणी एकत्र उभे आहेत आणि फोटोशूट करत आहेत. अचानक वधू वराला तलावाच्या दिशेने ढकलण्यास सुरुवात करते. या दरम्यान वर आपल्या वधूचा हात सोडत नाही, यामुळे दोघेही पाण्यात पडतात. काहींना प्लॅनिंग करून हा व्हिडिओ बनवला असावा, असं वाटतंय. पण, व्हिडिओ काहीही असला तरी खूपच मजेशीर आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे.
  (विवाहाच्या रिसेप्शन पार्टीत चक्क वधूनेच केला आनंदाच्या भरात गोळीबार) लग्नाचा हा मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्रामवर theadorableweddings पेजवरून शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. जवळपास 10 लाख लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे. या व्हिडिओवर हजारो लोकांनी कमेंटही केल्या आहेत. अनेक लोक व्हिडिओ शेअर करत आहेत.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Bride

  पुढील बातम्या