मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे! हिंमत पाहूनच व्हाल शॉक, मगरीवर बसून दुचाकी चालवताना दिसला व्यक्ती, पुढे काय झालं पाहा..VIDEO

बापरे! हिंमत पाहूनच व्हाल शॉक, मगरीवर बसून दुचाकी चालवताना दिसला व्यक्ती, पुढे काय झालं पाहा..VIDEO

आजकाल जो व्हिडिओ समोर आला आहे तो जरा वेगळा आहे. यामध्ये एक व्यक्ती अजिबातही न घाबरता मगरीला दुचाकीवर बसवून आरामात गाडी चालवताना दिसत आहे.

आजकाल जो व्हिडिओ समोर आला आहे तो जरा वेगळा आहे. यामध्ये एक व्यक्ती अजिबातही न घाबरता मगरीला दुचाकीवर बसवून आरामात गाडी चालवताना दिसत आहे.

आजकाल जो व्हिडिओ समोर आला आहे तो जरा वेगळा आहे. यामध्ये एक व्यक्ती अजिबातही न घाबरता मगरीला दुचाकीवर बसवून आरामात गाडी चालवताना दिसत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 21 जानेवारी : आजकाल सोशल मीडिया खूप लोकप्रिय आहे. इथे कोणतीही बातमी असो किंवा मजेशीर, इमोशनल तसेच डान्स व्हिडिओ असो, सगळं काही अगदी झपाट्यानं व्हायरल होतं. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकवेळा आपण आश्चर्यचकित होतो, तर अनेकवेळा आपल्याला असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे खूपच मजेशीर असतात. पण आजकाल जो व्हिडिओ समोर आला आहे तो जरा वेगळा आहे. यामध्ये एक व्यक्ती अजिबातही न घाबरता मगरीला दुचाकीवर बसवून आरामात गाडी चालवताना दिसत आहे.

पिल्लांसाठी साळींदर थेट बिबट्याशी नडलं, पाहा शिकारीचा थरारक Video

व्हिडिओ पाहताना ही मगर खरी असल्याचं वाटत आहे. प्राणीसंग्रहालयात तुम्ही अनेकदा मगरींला पाहिलं असेल. त्या जमिनीवर एखाद्या दगडाप्रमाणे पडून असतात. मात्र, जेव्हा शिकारीचा प्रश्न येतो तेव्हा ते प्रचंड वेगाने झेपावतात. एकदा मगरीने हल्ला केला तर त्यांच्या जबड्यातून सुटणं केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे. हा भयानक प्राणी वेगाच्या बाबतीत तितका वेगवान नाही. पण त्याची गनना जगातील धोकादायक प्राण्यांमध्ये होते.

View this post on Instagram

A post shared by @oy._.starrr

मात्र मगरीचा सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ थोडा वेगळा आहे. कारण यात एक व्यक्ती न घाबरता मगरीला आपल्या दुचाकीवर घेऊन जाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण मगरीला चक्क आपल्या गाडीवर घेऊन चालला आहे. या तरुणाने मगरीचं तोंड बांधलं आहे आणि रस्त्यावर अगदी वेगात गाडी चालवत आहे. कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Viral Video : 5 सिंह आणि एक म्हैस, कोण जिंकलं पाहा शिकारीचा थरार

हा व्हिडिओ एडिटेड असण्याची किंवा यातील मगर नकली असण्याचीही शक्यता आहे. मात्र, व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर oy._.starrr नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत 1.44 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, की आपल्या स्वार्थासाठी आजकाल माणूस किती क्रूर होत चालला आहे. तर दुसऱ्या एकाने कमेंट करत लिहिलं, की हाच खरा खतरो का खिलाडी आहे.

First published:

Tags: Crocodile, Shocking video viral