मराठी बातम्या /बातम्या /Viral /Viral Video : 5 सिंह आणि एक म्हैस, कोण जिंकलं पाहा शिकारीचा थरार

Viral Video : 5 सिंह आणि एक म्हैस, कोण जिंकलं पाहा शिकारीचा थरार

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

सिंहाच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर फिरत असतात. नेटकरी अशा व्हिडीओंना चांगली पसंती देतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 20 जानेवारी : जंगलात फक्त एकाच प्राण्याचं राज्य चालतं असं म्हटलं जातं आणि तो म्हणजे सिंह. त्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं. सिंहाच्या एका डरकाळीमुळे जंगलातील इतर प्राणी सैरभैर पळायला लागतात. एखाद्या शिकारीसाठी सिंह मागे लागला तर खूप प्रयत्नानंतरच त्याचा जीव वाचतो. सिंहाच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर फिरत असतात. नेटकरी अशा व्हिडीओंना चांगली पसंती देतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

समोर आलेला व्हायरल व्हिडीओ 5 सिंह आणि 1 म्हैसचा आहे. त्यांच्या शिकारीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, जंगलात सिंहांच्या जाळ्यात एक म्हैस अडकली आणि तिने आपला जगण्याचं साहस सोडलंच होतं पण शेवटच्या क्षणी अशी काही घटना घडली की तिचा जीव वाचवण्यात यश आले. म्हशीची शिकार केल्यानंतर एकूण पाच सिंहीण तिला खायला तयार होत्या, मात्र तेव्हाच दोन सिंहीण एकमेकांशी भिडल्या आणि एकमेकांवर हल्ला करू लागल्या. दुसरीकडे, एका सिंहाने हे भांडण पाहिल्यानंतर त्यांना वेगळे करण्यासाठी जबड्यातून बाहेर काढण्यास सुरुवात केली.

सिंहाच्या टोळीतच भांडणं सुरु झाल्यामुळे याचा फायदा त्या म्हशीला झाला. सिंह आणि सिंहीणची भांडणात म्हैस तिथून सटकून गेली. त्यामुळे तिचा जीव जाता जाता राहिला. हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही पहायला मिळत आहे. म्हशीला लागलं असतानाही तिनं तिच्या स्वतःला वाचविण्याचे प्रयत्न सोडले असतानाही शेवटच्या क्षणी तिचा जीव वाचला. नेटकरी या व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंट देखील करत आहेत. सिंहीणींची भांडणं पाहून नेटकरी म्हणाले महिला आणि त्यांच्या समस्या, महिलांची जेलेसी, अशा कमेंट व्हिडीओवर येत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर असे प्राण्यांचे आणि त्यांच्या शिकारीचे अनेक धक्कादायक आणि थरारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ पहायला नेटकऱ्यांना खूप आवडतं आणि असे व्हिडीओ व्हायरल होतात शेअर केले जातात.

First published:

Tags: Top trending, Video viral, Viral, Viral news