मराठी बातम्या /बातम्या /Viral /पिल्लांसाठी साळींदर थेट बिबट्याशी नडलं, पाहा शिकारीचा थरारक Video

पिल्लांसाठी साळींदर थेट बिबट्याशी नडलं, पाहा शिकारीचा थरारक Video

व्हायरल

व्हायरल

सोशल मीडिया हे असं माध्यम आहे ज्यामुळे लोक एकमेकांच्या जवळ आले आहेत. सोबत याचा उपयोग माहिती आणि मनोरंजनासाठीही होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 20 जानेवारी : सोशल मीडिया हे असं माध्यम आहे ज्यामुळे लोक एकमेकांच्या जवळ आले आहेत. सोबत याचा उपयोग माहिती आणि मनोरंजनासाठीही होत आहे. रोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हिडीओ पहायला मिळतात. विशेषतः नेटकरी वन्य जीवनावर आधारित असलेल्या व्हिडीओंना आवर्जुन पाहतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ बिबट्या आणि साळींदरच्या पिलांचा आहे. या व्हायरल व्हिडीओंमध्ये दिसतंय की, रस्त्यावर दोन साळींदर आणि साळींदराची पिल्ले दिसत आहे. अचानक एक बिबट्या येतो आणि त्या पिल्लांवर हल्ला करण्यासाठी पुढे सरसावतो. या दोन्ही पिल्लांच्या संरक्षणासाठी साळींदर बिबट्यावर पलटवार केल्याचं पहायला मिळत आहे. बिबट्याचा त्या पिल्लांवर डोळा असून तो त्यांचा शिकार करण्याचा खूप प्रयत्न करतो. साळींदरही त्यांच्या पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्याशी बिडतात.

या व्हायरल व्हिडीओवरुन पहायला मिळतंय आई आपल्या लेकरासाठी आणि त्याच्या संरक्षणासाठी कोणाशीही लढू शकते. मग समोर कितीही आणि कोणताही बलवान असू देत. आपल्या पिल्लांसाठी आपल्या लेकरांसाठी कुठलीही आई आपल्या जीवाची बाजी लावते.

बिबट्या आणि साळींदराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकवेळा हा व्हिडीओ पाहिला जात आहे. या एक मिनिटांच्या व्हिडीओला नेटकरी चांगला प्रतिसाद देत आहेत. अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालत असतात. बिबट्या, सिंह, वाघ यांच्या शिकारीच्या थराराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

दरम्यान, सोशल मीडियावर वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. फक्त प्राणी नव्हे तर पक्षी, पाळीव प्राणी, वस्तू, माणसांचेही अनेक विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि नेटकऱ्यांना काय आवडेल याचा काही नेम नाही.

First published:

Tags: Top trending, Videos viral, Viral, Viral news