मराठी बातम्या /बातम्या /Viral /'घरात घुसू नकोस...', चक्क सापालाच शेतकऱ्याने धमकावलं; पुढे जे घडलं ते शॉकिंग

'घरात घुसू नकोस...', चक्क सापालाच शेतकऱ्याने धमकावलं; पुढे जे घडलं ते शॉकिंग

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सापावर शेतकरी ओरडला आणि पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही.

कोइंबतूर, 29 जानेवारी : साप (Snake) म्हटलं तरी अंगाला दरदरून घाम फुटतो. असा साप समोर आला तर तोंडातून शब्दच फुटणार नाहीत. सापाशी पंगा घेण्याचा प्रयत्न कोणताच शहाणा माणूस करणार नाही. पण एका शेतकऱ्याने मात्र ते केलं. त्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सापासमोर तो छाती ताणत गेला आणि त्याला थेट धमकीच दिली (House owner scolding on snake). त्यातही पुढे जे घडलं यापेक्षाही धक्कादायक आहे.

तामिळनाडूतील (Tamilnadu) ही घटना आहे. कोइंबतूर जिल्ह्यातील थुडियालूरमध्ये गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास एक साप एका घरात घुसत होता. जवळपास चार फूट लांबीचा हा साप होता. तेव्हा त्या घराचा मालक शेतकरी असलेल्या कनगराजचं लक्ष केलं (Farmer scolding on snake). आता साप म्हटलं तर एखाद्या व्यक्तीची काय अवस्था होईल याची कल्पना तुम्ही करूच शकता. पण कनगराज मात्र सापाला पाहून बिलकुल घाबरला नाही. उलट तो इतका संतप्त झाला की रागात त्याने सापाला धमकावलं.

हे वाचा - दरूदरून घाम फुटला, किंचाळत पळाला; कित्येक वर्षे बंद घरात जाताच तरुणाची हवा टाईट

घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सापाला त्याने इथं येऊ नको, घरात घुसू नको, जंगलातच परत जा, असा आदेश दिला.  आता साप तो साप धमकी दिल्यानंतर त्याने केलं असेल असं तुम्हाला वाटतं. असं साप थोडी कुणाच्या धमकीला घाबरणार तो तर घरात घुसणारच असंच तुम्हाला वाटेल. पण नाही. या प्रकरणात असं काहीही झालं नाही. उलट इथं जे घडलं त्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.

शेतकरी ओरडताच साप इतका घाबरला त्याने घरात घुसण्याची हिंमतच केली नाही. शेतकऱ्याचा आदेशाचा त्याने निमूटपणे पालन केलं. त्याचा राग पाहून त्याने तिथून धूम ठोकली. तो इतक्या वेगाने आसा असा पळत सुटला की पळता पळता एका तलावात पडला.

हे वाचा - साप हातात घेऊन खेळू लागला लहान मुलगा अन्...; Shocking Video पाहून भडकले नेटकरी

यानंतर शेतकऱ्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तलावात  पडलेल्या सापाला बाहेर काढलं. त्याला पकडून जंगलात सोडून दिलं. झी न्यूजच्या रिपोर्टनुसार सोशल मीडियावर ही घटना व्हायरल होते आहे.

First published:
top videos

    Tags: Snake, Tamilnadu, Viral