नवी दिल्ली 05 नोव्हेंबर : काही लोक गाडी चालवताना इतकं अधिक स्पीड ठेवतात की अपघाताचा धोका फार वाढतो. अशात हे लोक केवळ स्वतःचाच नाही तर रस्त्यावरील इतरांचा जीवही धोक्यात टाकतात. तर काही लोक प्रसिद्ध मिळवण्यासाठी स्वतःचा जीवदेखील धोक्यात घालतात. इतकंच नाही तर टिकटॉक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media Platform) प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकांनी आपला जीवही गमवल्याच्या अनेक बातम्या समोर आलेल्या आहेत. नुकतंच असाच आणखी एक व्हिडिओ (Shocking Stunt Video) समोर आला आहे. यात दिसतं, की स्टंट करण्याच्या नादात या युवकाची भयंकर अवस्था झाली.
बाबो! माणसांप्रमाणे चक्क दोन पायांवर चालतो हा कुत्रा; वाचून वाटेल आश्चर्य
हा अपघाताचा व्हिडिओ (Accident Video Viral) दुचाकीच्या मागोमाग प्रवास करणाऱ्या कारमधील एका व्यक्तीनं शूट केला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाईकरच्या पोशाखात आणि आपल्या हेल्मेटवर GoPro कॅमेरा लावून दुचाकीनं प्रवास करताना दिसतो. हा Two Way रोड असूनही रस्त्याच्या मध्ये डिव्हायडर नव्हता.
#BeSafe💐 ऐसा मत करना😢😢😢😢
Hero की Heropanti nikal gayi 😢😢😢@ipskabra @arunbothra @ipsvijrk pic.twitter.com/fHZ2mo7Rgb — Rupin Sharma IPS (@rupin1992) October 27, 2021
व्हिडिओमध्ये दिसतं, की हा दुचाकीस्वार स्टंट करण्यासाठी सुरुवातीला गाडीचं पुढचं चाक हवेत उचलतो. यानंतर गाडीचा वेग वाढवतो. वेगात गाडी चालवत असतानाचा त्याचा तोल बिघडतो आणि तो समोरच्या बाजूने येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळतो. यानंतर गाडीचे तुकडे होतात तर दुचाकीस्वाराचीही भयंकर अवस्था होते.
लिफ्टमध्ये अडकला कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा, पुढं जे घडलं.. पाहा थरारक VIDEO
व्हिडिओमध्ये दिसतं, की हा व्यक्ती एका चाकावर गाडी चालवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारचा स्टंट चुकीचा झाल्याची ही पहिली वेळ नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मात्र, हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. हा व्हिडिओ IPS अधिकारी रूपिन शर्मा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, सुरक्षित राहा. असं करू नका. हिरोची हिरोपंती बाहेर निघाली. हा व्हिडिओ आतापर्यंत पाच लाखाहून अधिकांनी पाहिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.