मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अरे बापरे! फुलांवर पाणी शिंपडताच जमिनीतून बाहेर पडल्या दारूच्या बाटल्या

अरे बापरे! फुलांवर पाणी शिंपडताच जमिनीतून बाहेर पडल्या दारूच्या बाटल्या

बऱ्याचदा दारूच्या आहारी गेलेले लोक आपल्या घरात दारूच्या बाटल्यांचा (Alcohol Bottles) खजानाच ठेवतात. या गोष्टीची माहिती बऱ्याचदा त्यांच्या घरातील लोकांनाही नसते.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 05 जुलै : तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय (Social Media Users) असाल तर दररोज मजेशीर नवनवीन व्हिडिओ (Funny Videos) समोर येत असतील. यातील काही व्हिडिओ मजेशीर आणि काही हैराण कऱणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुमचा दिवसही खास होईल.

आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे, की दारू शरीरासाठी घातक असते. मात्र, बऱ्याचदा दारूच्या आहारी गेलेले लोक आपल्या घरात दारूच्या बाटल्यांचा (Alcohol Bottles) खजानाच ठेवतात. या गोष्टीची माहिती बऱ्याचदा त्यांच्या घरातील लोकांनाही नसते. मात्र, त्यांच्या खास मित्रांना या गोष्टीची माहिती नसते.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती फुलांवर पाणी शिंपडतो. यानंतर कुंडी वरती येऊ लागते आणि मग खाली व्हिस्कीचा संपूर्ण बार उघडतो. असं दिसतं, की हा छुपा बार घरच्या लोकांनाही माहिती नाही. हा केवळ मित्रांसाठीचा अड्डा असेल आणि तेदेखील कधी कधी पार्टीसाठी इथे येत असतील.

VIDEO : बिचाऱ्या पतीची पत्नीनं केली वाईट अवस्था; मस्करीत केलेलं कृत्य व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे. याच कारणामुळे अनेक यूजर्सनं यावर कमेंटही केली आहे. एका यूजरनं म्हटलं आहे, की हे दृश्य खरंच फार सुंदर आहे. तर, दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की काय जुगाड आहे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट करत या आयडियाचं कौतुक केलं आहे.

VIDEO:स्विमिंग पुलमध्ये अंघोळीचा आनंद घेताना दिसला कुत्रा; थाट पाहून व्हाल हैराण

हा मजेशीर व्हिडिओ आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा (IPS Officer Rupin Sharma) यांनी शेअर केला आहे. याला त्यांनी कॅप्शनही दिलं आहे. यात ते म्हणाले, गगन के तले दारू का प्यार पले..., ही बातमी देईपर्यंत व्हिडिओला शेकडो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.

First published:

Tags: Shocking news, Viral news