मराठी बातम्या /बातम्या /Viral /हातापाया पडूनही ती ऐकली नाही; शेवटी हतबल BF ने GF च्या लग्नात...; VIDEO VIRAL

हातापाया पडूनही ती ऐकली नाही; शेवटी हतबल BF ने GF च्या लग्नात...; VIDEO VIRAL

गर्लफ्रेंडच्या लग्नात बॉयफ्रेंडने केलं शॉकिंग काम.

गर्लफ्रेंडच्या लग्नात बॉयफ्रेंडने केलं शॉकिंग काम.

रागात दुसऱ्यासोबत लग्न करायला गेलेल्या गर्लफ्रेंडच्या लग्नात बॉयफ्रेंड पोहोचला आणि तिथं जे घडलं ते शॉकिंग आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 22 जानेवारी : कपल म्हटलं की त्यांच्यात भांडणं, रूसवेफुगवे, मनवणं हे सर्व आलंच. पण काही वेळा परिस्थिती इतकी टोकाला जाते की सर्वकाही हाताबाहेर जातं आणि नंतर पश्चाताप होतो, तोपर्यंत उशीर झालेला असतो. अशाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. कपलमध्ये भांडण झाल्यानंतर गर्लफ्रेंड रागात दुसऱ्याशी लग्न करायला गेली. तिला मनवण्यासाठी तिचा बॉयफ्रेंड थेट तच्या लग्नात पोहोचला. त्यानंतर तिथं जे घडलं ते धक्कादायक आहे.

भांडण झाल्यानंतर गर्लफ्रेंडने थेट दुसऱ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिची माफी मागण्यासाठी, समजूत काढण्यासाठी म्हणून तिच्या लग्नात गेला. स्टेजवर जाऊन आधी त्याने गर्लफ्रेंडचा रुसवा, राग दूर करण्याचा प्रयत्न केला. तिच्यासमोर तो ढसाढसा रडला, तिच्या हातापायाही पडला. पण तरी गर्लफ्रेंड काही ऐकेना. ती आपलं लग्न मोडायला तयार होईना. शेवटी बॉयफ्रेंडने असं काही केलं की पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

हे वाचा - ट्रॅफिकमध्ये अडकली नवरीबाई; मुहूर्ताआधी मंडपात पोहोचण्यासाठी असं काही केलं की VIDEO तुफान VIRAL

व्हिडीत तुम्ही पाहू शकता स्टेजवर नवरा-नवरी खुर्चीवर बसले आहेत. त्यांच्यासमोर एक तरुण रडताना दिसतो आहे. हा तरुण त्या नवरीचा बॉयफ्रेंड आहे. तो तिच्यासमोर ढसाढसा रडताना दिसतो आहे. हात जोडून तिची माफी मागतो आहे. पण ती त्याच्यावर ओरडताना, रागावताना दिसते आहे. त्याला तिथून निघून जायला सांगते आहे. बॉयफ्रेंड ऐकत नाही तो गुडघ्यावर बसतो आणि तिचे पायही धरतो, तिच्या पायावर आपलं डोकं टेकवून रडतो. पण तरी गर्लफ्रेंडला त्याची थोडीही दया येत नाही. ती तशीच कठोर राहते, आपल्या निर्णयावर ठाम राहते.

काही केल्या गर्लफ्रेंड ऐकत नाही आहे हे समजल्यानंतर बॉयफ्रेंडही तबल होतो. शेवटी तो नवरदेवाजवळ जातो आणि त्याच्याकडे विनवणी करताना दिसतो. त्याच्यासमोर हात पसरत त्याचेही पाय धरतो.

हे वाचा - खरंच 'मेड फॉर इच अदर' असतात? रक्ताचं नातं नसलं तरी नवरा-बायकोचे चेहरे सारखे का दिसतात?

एखाद्या फिल्ममधील वाटावा असा हा सीन आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. funtaap इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. काहींना हा व्हिडीओ पाहून तरुणाची दया आली आहे. तर काहींना हा व्हिडीओ मजेशीर वाटत आहे.

तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

First published:

Tags: Boyfriend, Couple, Girlfriend, Viral, Viral videos