Home /News /viral /

बापरे! 2 महाकाय अजगरांसोबत झोपला तरुण आणि...; खतरनाक VIDEO VIRAL

बापरे! 2 महाकाय अजगरांसोबत झोपला तरुण आणि...; खतरनाक VIDEO VIRAL

तरुणाने केली चक्क अजगरांसोबत झोपण्याची डेअरिंग.

  मुंबई, 30 ऑक्टोबर : किती तरी जण साध्या गांडुळालाही घाबरतात. साप (Snake video) समोर दिसला तर घामच फुटतो आणि समोर अजगर (Python) आला तर निम्मा जीव गेल्यातच जमा. पण एक तरुण मात्र चक्क महाकाय अजगरांसोबत (Python Video) झोपला. तब्बल दोन अजगरांसोबत झोपलेल्या या तरुणाचा (Man lying with pythons) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकीच भरेल (Two giant python video). ज्या अजगराला समोर पाहण्याचीही आपण कल्पना करू शकत नाही. अशा अजगरांसोबत हा तरुण चक्क झोपला आहे. व्हिडीओत पाहू शकता दोन अजगर एकमेकांना विळखा घालून आहेत. त्यांच्यासमोरच एक तरुण झोपलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नाही. अगदी बिनधास्तपणे तो या अजगरांच्या जवळ जाऊन त्यांना पाहताना दिसतो आहे. त्यांना हातही लावतो आहे.
  हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. royal_pythons_ इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. या व्यक्तीला वेड लागलं आहे, अशीच प्रतिक्रिया बहुतेक युझर्सनी दिली आहे. तर हा आतापर्यंतचा सर्वात सुंदर प्रेमाचा त्रिकोण आहे, अशी मजेशीर कमेंटही एका युझरने केली आहे. हे वाचा - अरे बापरे! भरसभेत घुसला महाकाय Dinosaur आणि...; व्हायरल होतोय Shocking Video हा तरुण तरी दोन अजगरांसोबत आहे. याआधी अशा बऱ्याच अजगरांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला होता. द रेप्टाइल झूच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन मिनिटांचा हा व्हिडीओ याआधी पोस्ट करण्यात आला होता.
  एक-दोन नव्हे तर तब्बल डझनभर अजगरांमध्ये ही व्यक्ती बसलेली आहे.  व्हिडीओतील सापांचा आकार पाहूनच तुम्ही हैराण व्हाल आतापर्यंत फिल्ममध्ये इतके मोठे अजगर तुम्ही पाहिले असतील. ज्यांच्यासमोर जाणं तर दूर तसा विचारही आपण करणार नाही. पण या व्यक्तीने तेच करून दाखवलं. त्याने तशी हिंमत केली. त्याच्यासोबत नेमकं काय घडलं पाहा. हे वाचा - थं लपलाय भला मोठा अजगर; आधी तुम्ही शोधा मग इतरांनाही चॅलेंज द्या व्हिडीओत पाहू शकता ही व्यक्ती चक्क महाकाय अजगरांमध्ये मस्ती करत आहे. या भल्यामोठ्या सापांसोबत ती खेळताना दिसते आहे. जमिनीवर आधी काही साप आहेत, त्यांच्यामध्ये ही व्यक्ती अगदी आरामात, बिनधास्तपणे बसली आहे. कॅमेऱ्यासमोर पाहत बोलतानाही दिसते आहे. व्यक्तीच्या डोक्यावरसुद्धा काही अजगर आहेत. ही व्यक्ती बोलत असताना अजगर एखाद्या गोळ्यासारखे त्याच्या डोक्यावर धाडकन कोसळतात. पण तरी ही व्यक्ती बिलकुल घाबरत नाही. पण आपल्याला मात्र तेव्हा धडकी भरते.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Python, Python snake, Shocking viral video, Snake, Snake video, Viral, Viral videos

  पुढील बातम्या