वॉशिंग्टन, 29 ऑक्टोबर : डायनोसोर (Dinosaur) तुम्ही प्रत्यक्षात पाहिले नसले तरी फिल्ममध्ये नक्कीच पाहिले आहेत. भलेमोठे डायनोसोर पाहूनच धडकी भरते (Dinosaur video). विचार करा, असा डायनोसोर अचानक तुमच्यासमोर आला तर काय होईल? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका सभेत अवाढव्य डायनोसोर घुसला. ही सभा साधी सभा नव्हे तर संयुक्त राष्ट्राची सभा आहे (Dinosaur in united nation assembly). संयुक्त राष्ट्रसभा जिथं जगातील बडे नेते भाषण देताना दिसतात. त्याच महासभेत एक अवाढव्य डायनोसोरही दिसला.आता साहजिक डायनोसोरला पाहून सर्वांनाच घाम फुटला. तिथं उपस्थितानांच नव्हे तर अगदी तुम्हा-आम्हालाही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्यच वाटलं. कारण डायनोसोर जे सध्या अस्तित्वात नाहीत त्यांचं दर्शन झालं म्हणजे धक्का बसणारच नाही का?
The best message you get on #ClimateChange. Be serious. pic.twitter.com/LZfFSpTn6N
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) October 29, 2021
आता हा व्हिडीओ खरा नाही आहे. म्हणजे प्रत्यक्षात संयुक्त राष्ट्रसभेत असा डायनोसोर घुसलेला नाही. तर हा एक हॉलिवूड फिल्ममधील सीन आहे. हे वाचा - माकडाने पळवला चष्मा, परत मिळवण्यासाठी द्यावी लागली लाच; पाहा VIDEO संयुक्त राष्ट्रसभा जिथं जगातील कित्येक देशांचे बडे बडे नेते येतात. तिथल्या व्यासपीठावर आपल्या देशाच्या समस्या जगासमोर मांडतात. हा डायनोसोरही अशीच समस्या घेऊन इथं आला आहे. तो व्यासपीठावर येतो आणि बोलतानाही दिसतो. तो जगाला वातावरण बदलाबाबत माहिती देतो आहे. जगाला एका संकटाबाबत सावध करताना दिसतो आहे. हे वाचा - OMG! चक्क मगरीच्या जबड्यातून बाहेर पडला तरुण; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. पर्यावण बदलाबाबत सर्वात चांगला संदेश. गांभीर्याने घ्या. असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

)







