मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

इथं लपलाय भला मोठा अजगर; आधी तुम्ही शोधा मग इतरांनाही चॅलेंज द्या

इथं लपलाय भला मोठा अजगर; आधी तुम्ही शोधा मग इतरांनाही चॅलेंज द्या

नेटिझन्स सध्या या अजगराला शोधत आहेत, तुम्हीदेखील प्रयत्न करून पाहा.

नेटिझन्स सध्या या अजगराला शोधत आहेत, तुम्हीदेखील प्रयत्न करून पाहा.

नेटिझन्स सध्या या अजगराला शोधत आहेत, तुम्हीदेखील प्रयत्न करून पाहा.

मुंबई, 1 जुलै : आता कोरोना लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. अनेक जण घरातच आहेत. घरातल्या घरात कुटुंबासह काही गेम खेळले जात आहेत किंवा मित्रमैत्रिणींसह तुम्ही ऑनलाइन गेम खेळत असाल. तर अशात आणखी एक गेम तुमच्यासाठी. सध्या सोशल मीडियावर बरेच जण असे गेम खेळत आहे. आता हा फोटो भलामोठा अजगर (Python) लपून बसला आहे, त्याला तुम्हाला शोधायचं आहे.

एका फेसबुक युझरने हा फोटो शेअर केला आहे आणि त्यामध्ये साप शोधण्याचं आव्हान दिलं आहे. सोशल मीडियावर (Social Media)  हा फोटो व्हायरल झाला आहे, त्यानंतर नेटिझन्स आता हा साप शोधण्यात गुंतलेत.

आता तुम्ही म्हणाला या फोटोत फक्त अजगरालाच शोधायचं आहे ना? त्यात काय इतकं मोठं. मात्र कित्येक युझर्सना हा अजगर काही सापडलेला नाही. या फोटोत अजगर शोधणं म्हणजे एखाद्या गवताच्या ढिगाऱ्यात सुई शोधण्यासारखंच आहे.

हे वाचा - आता हे चॅलेंज तुम्ही घ्याच! या फोटोत पाल शोधून दाखवा बरं

तुम्हाला या फोटोत अजगर शोधणं सोपं वाटत असेल तर मग पाहा तुम्हाला सापडतो आहे का? सापडला का?  त्या लाकडाच्या ढिगाऱ्याखाली नीट पाहा. हो! त्या लाकडांच्या खालीच अजगर लपलेला आहे. त्याने आपलं तोंड हलकसं वर काढलेलं आहे.

तुम्हाला अजगर सापडला तर मग उत्तमच आहे. आता अजगर शोधण्याचं हे चॅलेंज तुमच्या मित्रमैत्रिणींना द्या. त्यांना ही बातमी शेअर करा.

संपादन - प्रिया लाड

First published:

Tags: Game, Lifestyle, Viral photo