मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वडिलांच्या अंत्यसंस्काराला गेला आणि मुलाला गमावून बसला, 24 तासात दोघांच्या मृत्यूने शिक्षक कोमात

वडिलांच्या अंत्यसंस्काराला गेला आणि मुलाला गमावून बसला, 24 तासात दोघांच्या मृत्यूने शिक्षक कोमात

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kotar, India
  • Published by:  Devika Shinde

गुना 12 सप्टेंबर : बऱ्याचदा आपल्यासमोर असे काही बातम्या समोर येत असतात, ज्यावर विश्वास ठेवणे तसे कठीण आहे. परंतू त्या खऱ्या आहेत. सध्या अशीच एक बातमी समोर आली ज्यामध्ये 24 तासाच्या आता एकाच घरातील दोन लोकांना मृत्यू झाला आहे. यामध्ये आजोबांच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या नातवाचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एका बापानं एक मुलगा आणि एका मुलानं एक बाप दोन्ही गमावला आहे. हा धक्का सहन न झाल्यामुळे या व्यक्तीची प्रकृती अधीकच बिघडली. ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुणाचे स्वातंत्र्यसैनिक कै. सरदार सिंग यांचा मुलगा परमल सिंग रघुवंशी यांचे शनिवारी सायंकाळी आजारपणामुळे निधन झाले. आजोबांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचा नातू प्रियव्रत सिंग राजस्थानमधील कोटा येथून गुना येथे पोहोचला होता.

हे वाचा : Traffic जाममध्ये अडकला डॉक्टर, हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेला उशीर होतोय म्हणून उचललं असं पाऊल, आता Video होतोय व्हायरल

प्रियव्रत सिंह रविवारी सकाळी त्याच्या आजोबांच्या अंत्यसंस्कारासाठी तेथे गेला, अंत्यसंस्कार करून सर्वजण परतले. तेव्हा काही वेळाने प्रियव्रत अचानक घरातून कार घेऊन सिंध नदीवर पोहोचला. तेथे तो पोहण्यासाठी पाण्यात गेला परंतू तेथेच त्याचा मृत्यू झाला.

प्रियव्रत सिंग, सोर्स : गुगल

प्रियव्रत सिंग, सोर्स : गुगल

खरंतरनदीत पाणी कमी असल्याचे पाहून तो तेथे आंघोळीसाठी उतरला होता, मात्र अवैध वाळू उत्खननामुळे नदीत मोठमोठे खड्डे पडले होते, ज्यामुळे आंघोळ करत असताना प्रियव्रत अचानक एका खड्ड्यात अडकला, ज्यामुळे त्याला पुन्हा पाण्याबाहेर येता आलेच नाही. अखेर पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

हे वाचा : बैलाला पाहाताच गाडीच्या छतावर बसली व्यक्ती, पण त्यानंतर केली अशी चूक, पाहून सगळेच पडले विचारात ; Video Viral

अवघ्या 24 तासात आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय हवालदिल झाले होते, तर अगदी 24 तासात मुलगा आणि वडील गेल्याने शिक्षक वडिलांना खूपच मोठा धक्का बसला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यामुळे शिक्षक कोमामध्ये गेला होता, ज्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

First published:

Tags: Shocking accident, Top trending, Viral news