Home /News /viral /

विचित्र ऑनलाईन ट्रेंडमुळे महिला हैराण; मुलांच्या मस्तीमुळे होतायेत गरोदर, काय आहे प्रकरण?

विचित्र ऑनलाईन ट्रेंडमुळे महिला हैराण; मुलांच्या मस्तीमुळे होतायेत गरोदर, काय आहे प्रकरण?

व्हायरल होणाऱ्या या ट्रेंडमध्ये युवक सुपरमार्केटमध्ये सेल्फवर ठेवलेल्या कंडोमच्या पॅकेट्समध्ये छिद्र करत आहेत. अशात हे कंडोम वापरल्यानंतरही महिला गरोदर होत असल्याच्या घटना समोर येत आहेत

  नवी दिल्ली 29 जानेवारी : सोशल मीडियाचा (Social Media) वापर आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर अनेक प्रकारचे नवे ट्रेंडही सुरू होतात. अनेकदा काहीतरी वेगळं चॅलेंज सोशल मीडियावर दिलं जातं आणि हे पूर्ण करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. सध्या असाच एक अजब ट्रेंड (Weird Online Trend) लोकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. व्हायरल होणाऱ्या या नव्या ट्रेंडमुळे विशेषतः महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे महिला गरोदर होत आहेत. आता तुम्हीही विचार करत असाल की एखाद्या ट्रेंडमुळे कोणी प्रेग्नंट (Pregnant Woman) कसं होऊ शकतं? मात्र हे प्रकरण अतिशय अजब आहे. 'कृपया लक्ष द्या...'; लग्नाआधी सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत नवरीने दिली Warning सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवरील हा अजब ट्रेंड अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. व्हायरल होणाऱ्या या ट्रेंडमध्ये युवक सुपरमार्केटमध्ये सेल्फवर ठेवलेल्या कंडोमच्या पॅकेट्समध्ये (Condom Packet) छिद्र करत आहेत. अशात हे कंडोम वापरल्यानंतरही महिला गरोदर होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे अनवॉन्टेड प्रेग्नंसीची प्रकरणं वाढली आहेत. अशात आता लोकांना या ट्रेंडबाबत वॉर्निंग देण्यात आली आहे. यात लोकांनी कंडोम खरेदी करण्याआधी त्यात छिद्र आहे का, हे तपासून घ्यावं असं सांगितलं जात आहे. याआधीही कंडोमबाबतचे दोन आणखी चॅलेंज ट्रेंड झाले होते. यातील एकात लेटेक्स कंडोम कानातून गळ्यापर्यंत आणण्याचा ट्रेंड होता.. तर एकात पाण्याने भरलेलं कंडोम डोक्यावर फोडण्याचा ट्रेंड होता. महिल्या चॅलेंजमध्ये लोकांना श्वास गुदमरण्याची शक्यता होती. हे घरी ट्राय करू नये, असा सल्ला लोकांना देण्यात आला होता. अशात आता हा नवीन ट्रेंड पुन्हा महिलांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. कारण कंडोम वापरूनही अनेक महिला गरोदर होत आहेत. अशाप्रकारचे किती कंडोम विकले गेले आहेत, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही.

  नाव मोठं लक्षण खोटं! 5 Star Hotel मधील Dirty Secrets; धक्कादायक वास्तव उघड

  मागील काही दिवसांपूर्वीच कंडोममध्ये लाल मिर्चीची चटणी भरण्याचा एक ट्रेंड आला होता. लोकांचा असा गैरसमज आहे की असं केल्यानं स्पर्म पूर्णपणे मरतात आणि गरोदर होण्याची शक्यता संपते. याबाबतही एक्सपर्ट्सने चिंता व्यक्त केलेली. एक्सपर्ट्सचं असं म्हणणं होतं, की हा विचार करूनही भीती वाटते. अशात लोक फक्त स्पर्म मारण्यासाठी या अफवेवर विश्वास ठेवून एवढं मोठं पाऊल उचलत आहेत, हे चुकीचं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Pregnant woman, Sex, Shocking news

  पुढील बातम्या