मुंबई, 12 ऑक्टोबर : प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो. त्यामुळे कितीतरी वेळा अगदी समोर माणसाचा जीव धोक्यात असताना पाहूनही माणसं धावून जात नाहीत. पण काही लोक असे असतात जे फक्त माणसंच नाही तर प्राण्यांसाठीही (Animal video) आपला जीव धोक्यात टाकतात. आपला जीव पणाला लावून एका मुक्या जीवाला (Dog rescue video) वाचवणाऱ्या अशाच एका तरुणाचा (Man saved dog video) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.
एका कुत्र्यासाठी एका तरुणाने चक्क स्वतःला मृत्यूच्या दारात झोकून दिलं (Man saved dog on railway track). कुत्र्याला वाचवण्यासाठी त्याने भरधाव ट्रेनसमोर उडी मारली. ट्रेन येत असताना रेल्वे ट्रॅकवर कुत्रा दिसताच हा तरुणही रेल्वे ट्रॅकवर गेला. कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला. कुत्र्याचा बचावाची ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल.
हे वाचा - अद्भुत! अंगावर पाणी पडताच रंग बदलतो हा मासा; कधीच पाहिला नसेल असा VIDEO
व्हिडीओत पाहू शकता एक तरुण रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या उंचावरून पळत रेल्वे ट्रॅकवर येतो. तो ट्रॅकवर येताच त्याच्या मागून एक भरधाव ट्रेनही येताना दिसते. तरुण त्याच ट्रेनसमोरून ट्रॅकवर पळत सुटतो. पुढे गेल्यानंतर तिथं त्याच ट्रॅकवर एक कुत्रा उभा असलेला दिसतो. कुणीतरी या कुत्र्याला ट्रॅकवर बांधलेलं आहे. तरुण त्याला पाहतो आणि धावत त्याला वाचवण्यासाठी येतो. त्या कुत्र्याच्या गळ्यातील चैन रेल्वे ट्रॅकवरून सोडवतो.
View this post on Instagram
ट्रेन त्यांना धडकणारच इतक्यात तो त्या तरुण कुत्र्याला घेऊन बाजूला होता. व्हिडीओ पाहतानाच आपल्या अंगावर अक्षरश: काटा येतो. अवघ्या काही सेकंदामुळे कुत्रा आणि तरुणाचा जीव वाचतो. कुणीतरी या कुत्र्याला या ट्रॅकवर मरणासाठी सोडलं पण हा तरुण कुत्र्यासाठी देवदूत बनून धावत आला आणि त्याला जीवदान दिलं.
हे वाचा - बाबो! हसत-खेळतं 14 फूटी महाकाय अजगराचं रेस्क्यू ऑपरेशन; VIDEO पाहून हादराल!
स्नगली टेल्स इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या तरुणाच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली आहे. त्याचं कौतुक केलं आहे. त्याला हिरो म्हटलं जातं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Viral, Viral videos