• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • बाबो! हसत-खेळतं 14 फूटी महाकाय अजगराचं रेस्क्यू ऑपरेशन; VIDEO पाहून अंगावर काटा उभा राहील

बाबो! हसत-खेळतं 14 फूटी महाकाय अजगराचं रेस्क्यू ऑपरेशन; VIDEO पाहून अंगावर काटा उभा राहील

सर्पमित्राने कसं केलं रेस्क्यू..पाहा संपूर्ण घटना...

  • Share this:
गुहागर, 11 ऑक्टोबर : पावसाळ्यात अनेक ठिकाणी अजगर आणि साप बाहेर निघत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहे. दरम्यान गुहागरमधून अजगर पकडण्याचा एक व्हिडीओ (A video of catching a python from Guhagar) समोर आला आहे. हा व्हिडीओ गुहागर येथील शृंगारतळी भागातील आहे. येथे आज सायंकाळी मुस्लीम वस्तीत महाकाय अजगर आढळून आला. भक्ष्याच्या शोधत वस्तीमध्ये शिरलेल्या या अजगराने एका मांजराला आपली शिकार केली.हा महाकाय अजगर वस्तीत शिरल्याचे पाहताच स्थानिकांची बोबडीच वळली. (Shocking Video) महाकाय अजगराला पाहताच स्थानिकांचा आरडाओरड सुरू झाला. दरम्यान  इथल्याच एका सर्पमित्राने या अजगराला शिताफीने पकडत वनविभागाच्या ताब्यात दिले. या अजगराची लांबी तब्बल 14 फूट असून वजन सुमारे 35 ते 40 किलो एवढं आहे. सर्पमित्र अरमान मुजावर याने या अजगराला वनविभागाच्या ताब्यात देत जीवदान दिलं. हा अजगर भक्ष्याच्या शोधात होता. दरम्यान त्याने एक मांजरीला आपली शिकार केलं. सर्पमित्राने वेळेत येऊन अजगराला पकडलं आणि वन खात्याकडे सोपवलं. या रेस्क्यू दरम्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
Published by:Meenal Gangurde
First published: