मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हनिमूनचं प्लॅनिंग मित्रांना सांगून फसला तरूण; पुढे घडलं भलतंच

हनिमूनचं प्लॅनिंग मित्रांना सांगून फसला तरूण; पुढे घडलं भलतंच

या व्यक्तीने सांगितलं की लग्नाला ७ महिने बाकी असतानाच त्याने आणि त्याच्या पत्नीने हनिमूनबद्दल प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली. या व्यक्तीने हे प्लॅनिंग आपल्या मित्रांना सांगितलं

या व्यक्तीने सांगितलं की लग्नाला ७ महिने बाकी असतानाच त्याने आणि त्याच्या पत्नीने हनिमूनबद्दल प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली. या व्यक्तीने हे प्लॅनिंग आपल्या मित्रांना सांगितलं

या व्यक्तीने सांगितलं की लग्नाला ७ महिने बाकी असतानाच त्याने आणि त्याच्या पत्नीने हनिमूनबद्दल प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली. या व्यक्तीने हे प्लॅनिंग आपल्या मित्रांना सांगितलं

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 18 डिसेंबर : नवविवाहित जोडप्यासाठी हनिमून म्हणजे केवळ एक नवीन ठिकाण फिरणं नसतं तर अशी वेळ असते जेव्हा ते एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखायला लागतात. ते केवळ शारीरिकच नाही तर मानसिकरित्याही एकमेकांच्या अगदी जवळ येतात. याच कारणामुळे दोघांमधील बॉन्डिंग चांगलं व्हावं, यासाठी घरचे कोणीही या जोडप्यासोबत जात नाही. हे जोडपंच ट्रीपसाठी जातं. मात्र आता जी घटना समोर आली आहे, त्यात एका व्यक्तीने आपल्या मित्रांनाही हनिमूनसाठी आपल्या सोबत येण्यास सांगितलं (Man Invited Friends on Honeymoon).

भूकेलेल्या हत्तीचा किचनमध्ये शिरत भलताच कारनामा, VIDEO पाहून व्हाल अवाक 

सोशल मीडिया साईट रेडिटवर नुकतंच एका व्यक्तीने एक अतिशय विचित्र घटना सांगितली. यानंतर लोक या व्यक्तीला ट्रोल करू लागले. या व्यक्तीने सांगितलं की लग्नाला ७ महिने बाकी असतानाच त्याने आणि त्याच्या पत्नीने हनिमूनबद्दल प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली. या व्यक्तीने हे प्लॅनिंग आपल्या मित्रांना सांगितलं. आपण आधीपासूनच जाण्याचं प्लॅनिंग करत असलेल्या जागीच (Best Places for Honeymoon) हे जोडपं फिरायला जाणार असल्याचं समजताच हे मित्र उत्साही झाले आणि त्यांनी म्हटलं की आम्हालाही सोबत घेऊन गेलात तर मजा येईल.

मित्रांचं हेच बोलणं मनावर घेऊन या व्यक्तीने त्यांनाही आपल्यासोबत येण्यास सांगितलं. नंतर त्याने ही बाब आपल्या होणाऱ्या पत्नीला सांगताच ती भडकली. तिने नाराजी व्यक्त करत आपल्या होणाऱ्या पतीला वेडाही म्हटलं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीने महिलेला समजवण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्याने असंही सांगितलं की मित्र सोबत असतील तर ही ट्रीप अधिक खास होईल. मात्र, महिलेनं काहीच ऐकलं नाही.

तो हट्ट पडला महागात; नवरदेवाची लग्नमंडपातच लाथा-बुक्क्यांनी धुलाई

या व्यक्तीने विचार केला की लोक त्याला सल्ला देतील की आपल्या होणाऱ्या पत्नीला कसं समजवायचं. याच उद्देशाने त्याने हे सर्व रेडिटवर शेअर केलं. मात्र लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका व्यक्तीने कमेंट करत म्हटलं, हनिमून आणि बॉईज ट्रीपमध्ये फरक असतो. तर अनेकांनी असाही सवाल केला की आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत चर्चा न करताच हा व्यक्ती आपल्या मित्रांना हनिमूनसाठी सोबत येण्यास कसं सांगू शकतो. तर आणखी एकाने कमेंट करत म्हटलं, हनिमून पार्टनरला समजून घेण्यासाठी असतं, मित्रांसोबत मस्ती करण्यासाठी नाही.

First published:

Tags: Viral news, Wedding couple