नवी दिल्ली 18 डिसेंबर : भूक अनेकदा माणसासोबतच प्राण्यांनाही काहीही करण्यास भाग पाडते. माणसू असो किंवा प्राणी, उपाशी राहाणं कोणालाही शक्य नाही. त्यामुळे भूक लागल्यावर प्रत्येकजण अन्नाच्या शोधात असतो. सध्या अशाच एका भूकेल्या हत्तीचा व्हिडिओ समोर आला आहे. तसं पाहायला गेलं तर हत्ती हा अतिशय शांत जीव आहे. मात्र, सध्या एका हत्तीला भूकेनं माणसांच्या किचनपर्यंत नेल्याचं पाहायला मिळतं (Hungry Elephant Entered in Kitchen) . या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Viral Elephant Video) होत आहे. स्टंट करण्याच्या नादात थेट मृत्यूच्या दारात पोहोचला; अंगावर काटा आणणारा VIDEO इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेजचे अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एक हत्ती दिसत असून त्याला भरपूर भूक लागली असल्याचं जाणवतं. आपली भूक भागवण्यासाठी हा हत्ती एका घरातील किचनच्या खिडकीमधून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र पूर्णपणे आत जाणं शक्य न झाल्याने तो आपली सोंड खिडकीतून आत टाकत अन्न शोधू लागतो.
The elephant is so homely that it wants to close the cupboard before leaving… pic.twitter.com/Yn2jf0eoDD
— Susanta Nanda (@susantananda3) December 15, 2021
या व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, हत्ती इतका समंजस आहे की इथून जाण्याआधी कपाटही लावून जाण्याचा प्रयत्नही करत आहे. व्हिडिओ बनवणारे लोक हत्तीपासून बरेच लांब उभा आहेत आणि त्याला पळवून लावण्यासाठी मोठमोठ्याने ओरडताना आणि ताटांचा आवाज करताना दिसत आहेत. मात्र हत्तीवर याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. सगळ्यात मजेशीर बाब म्हणजे व्हिडिओच्या शेवटी जेव्हा हत्ती कपाटातून अन्न बाहेर काढतो तेव्हा तो कपाटाचं दारही पुन्हा लावून घेतो आणि यानंतर तिथून जातो.
मैत्रिणीलाच लग्नात प्रवेश नाकारला; नवरीच्या निर्णयामागचं कारण वाचून व्हाल थक्क
हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 30 हजार लोकांनी पाहिला आहे. तर 200 हून अधिकांनी रिट्विट केला आहे. 1400 हून अधिकांनी व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.