मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /तो हट्ट पडला महागात; पाहुण्यांसमोरच झाली नवरदेवाची पोलखोल, लग्नमंडपातच लाथा-बुक्क्यांनी धुलाई

तो हट्ट पडला महागात; पाहुण्यांसमोरच झाली नवरदेवाची पोलखोल, लग्नमंडपातच लाथा-बुक्क्यांनी धुलाई

नवरदेवाच्या वडिलांनी हुंडा (Dowry) म्हणून दहा लाख रुपये कॅशची मागणी केली. नवरदेवाच्या वडिलांनी म्हटलं की पैसे मिळाले नाहीत तर हे लग्न होणार नाही.

नवरदेवाच्या वडिलांनी हुंडा (Dowry) म्हणून दहा लाख रुपये कॅशची मागणी केली. नवरदेवाच्या वडिलांनी म्हटलं की पैसे मिळाले नाहीत तर हे लग्न होणार नाही.

नवरदेवाच्या वडिलांनी हुंडा (Dowry) म्हणून दहा लाख रुपये कॅशची मागणी केली. नवरदेवाच्या वडिलांनी म्हटलं की पैसे मिळाले नाहीत तर हे लग्न होणार नाही.

नवी दिल्ली 18 डिसेंबर : दिल्लीच्या जवळच असलेल्या गाझियाबादच्या साहिबाबाद परिसरात एका नवरदेवाची चांगलीच धुलाई झाली (Groom beaten before marriage) . घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल (Wedding Video Viral) झाला आहे. हे वाचून तुम्हालाही अजब वाटलं असेल. मात्र या नवरदेवाची धुलाई का झाली, हे ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल की त्याच्यासोबत अगदी बरोबरच झालं.

जवळपास दीड मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये नवरीच्या घरचे नवरदेवाला ओढून त्याला मारहाण करत असल्याचं दिसतं. नवरदेवाची नातेवाईक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचं झालं असं की लग्नाच्या काही वेळ आधीच नवरदेवाच्या वडिलांनी हुंडा (Dowry) म्हणून दहा लाख रुपये कॅशची मागणी केली. नवरदेवाच्या वडिलांनी म्हटलं की पैसे मिळाले नाहीत तर हे लग्न होणार नाही.

मैत्रिणीलाच लग्नात प्रवेश नाकारला; नवरीच्या निर्णयामागचं कारण वाचून व्हाल थक्क

लग्नाआधीच नवरीच्या कुटुंबीयांनी तीन लाख रोख आणि एक लाख रुपयांची हिऱ्याची अंगठी नवरदेवाला दिली होती. मात्र नवरदेवाकडच्या लोकांना आणखी हुंडा हवा होता. नवरीकडच्या लोकांनी भरपूर विनंती करूनही त्यांनी काहीच ऐकलं नाही.

यानंतर मग नवरदेवाच्या धुलाईचा लाईव्ह शो सुरू झाला. हे सगळं इथेच थांबलं नाही. काही वेळातच नवरदेवाची पोलखोलही झाली. नवरीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार काही वेळातच समजलं की नवरदेवाची आधीच २-३ लग्न झालेली आहेत. आरोपी नवरदेवाचं नाव मुज्जमिल असं असून तो आग्रा येथील रहिवासी आहे.

या अतिविषारी सापाच्या सौंदर्यावर फिदा झाले लोक; यात असं आहे तरी काय? पाहा VIDEO

लग्नमंडपातच नवरदेवाची धुलाई झाल्याचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधी अनेकदा हुंडा मागितल्याने किंवा दारूडा असल्याने नवरदेवाला माराहण होऊन लग्न मोडली आहेत. सध्या लग्नातच हुंड्याची मागणी करणाऱ्या आणि आधीपासूनच विवाहित असूनही मुलीकडच्यांची फसवणूक करणाऱ्या या नवरदेवाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bridegroom, Wedding