जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: बॉडी बनवण्याची हौस भलतीच महागात पडली; जिममध्ये तरुणासोबत घडली मोठी दुर्घटना

VIDEO: बॉडी बनवण्याची हौस भलतीच महागात पडली; जिममध्ये तरुणासोबत घडली मोठी दुर्घटना

VIDEO: बॉडी बनवण्याची हौस भलतीच महागात पडली; जिममध्ये तरुणासोबत घडली मोठी दुर्घटना

व्हिडिओमध्ये दिसत की एक व्यक्ती आपली छाती आकर्षक आणि फीट करण्यासाठी अतिशय जास्त वचन उचलून जिममध्ये बेंच प्रेस करत आहे. मात्र त्याची हिंमत त्यालाच महागात पडते

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 13 मार्च : सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. दररोज हजारो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अतिशय मनोरंजक आणि खळखळून हसवणारे असतात. तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. या व्हिडिओंला नेटकऱ्यांचीही चांगलीच पसंती मिळते. इथे अनेकदा अंगावर काटा आणणाराही कंटेंट पाहायला मिळतो. छतावरुन उडी घेतली पण तोल गेला; अनेक फुटांवरुन खाली कोसळला, VIDEO सध्याच्या काळात प्रत्येकजण आपल्या आरोग्याच्या बाबतीत अतिशय जागरूक आहे. यामुळे अनेक लोक डायट फॉलो करताना दिसतात तर अनेक लोक जिममध्ये जाऊन बॉडी बनवताना दिसतात. याच कारणामुळे अनेकदा लोकांचे बॉडी ट्रान्सफॉरमेशन (Body Transformation) आणि जिमिंगचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या एक असाच व्हिडिओ समोर आला आहे. यात एक व्यक्ती जिममध्ये जीवन मरणाची लढाई लढताना दिसतो.

जाहिरात

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Shocking Video Viral) एक व्यक्ती जिममध्ये अतिशय मेहनत घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत की एक व्यक्ती आपली छाती आकर्षक आणि फीट करण्यासाठी अतिशय जास्त वचन उचलून जिममध्ये बेंच प्रेस करत आहे. मात्र त्याची हिंमत त्यालाच महागात पडते, जेव्हा तो थेट मृत्यूच्या दारात पोहोचतो. स्टंट करण्यासाठी वेगात धावत आली पण पाय घसरला अन्…; Shocking Video व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जास्त वजन असल्याने या व्यक्तीला ते वजन उचलता येत नाही. सुरुवातीला हे सर्व वजन त्याच्या छातीवर येतं आणि मग हा व्यक्तीच्या त्याच्या खालून बाहेर निघण्याचा प्रयत्न करू लागतो. यानंतर संपूर्ण वजन त्याच्या मानेवर आल्याचं दिसतं. हा व्हिडिओ हैराण करणारा आहे. हा व्यक्ती यात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात