नवी दिल्ली 12 मार्च : तुम्ही स्टंटचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. स्टंटचे काही व्हिडिओ अतिशय हैराण करणारे असतात. तर काही व्हिडिओ इतके खतरनाक असतात की ते पाहूनच अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून काही वेळासाठी तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. यात स्टंट करणाऱ्या व्यक्तीसोबत वेगळीच दुर्घटना घडते (Dangerous Stunt Video). स्टंट करण्यासाठी वेगात धावत आली पण पाय घसरला अन्…; Shocking Video व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती खतरनाक स्टंट कऱण्याचा प्रयत्न करतो. या नादात तो अनेक फूटांवरुन खाली कोसळतो. सहाजिकच एवढ्या उंचीवरुन खाली कोसळल्यावर तरुणाला भरपूर मार लागला असेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की स्टंट करण्याच्या नादात या युवकासोबत भलतंच काहीतरी घडतं. त्याला भयंकर दुखापत होते. ज्या पद्धतीने हा व्यक्ती पडलाय ते पाहून जाणवतं की त्याची हाडंही तुटली असतील.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एक व्यक्ती छतावरुन धावत येतो. स्टंट करण्यासाठी तो समोर असलेल्या दुसऱ्या छतावर उडी घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र बॅलन्स बिघडल्याने तो ज्याठिकाणी उडी घेण्याचा प्रयत्न करत असतो तिथपर्यंत पोहोचत नाही. यामुळे तो अनेक फूट खाली कोसळतो. त्याला पाहून जाणवतं की भरपूर मार लागलेला आहे. पित्यानेच चिमुकल्याला दुसऱ्या मजल्याहून खाली फेकलं, मन सुन्न करणारा VIDEO चांगली गोष्ट ही होती की त्याचं डोकं छताच्या कोपऱ्याला धडकलं नाही. अन्यथा त्याला आणखीच गंभीर दुखापत झाली असती. व्हिडिओमध्ये दिसतं की जास्त मार लागला असता तर त्याचा जीवही जाऊ शकत होता. व्हिडिओ इन्स्टाग्रामवर parkour_extreme_youtube नावाच्या अकाऊंटवरुन शेअऱ केला गेला आहे. आतापर्यंच दीड मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर लाखो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.