Home /News /viral /

ऐन लग्न मंडपात नवरदेवाच्या तोंडून निघालं असं काही की...; Funny Video आला समोर

ऐन लग्न मंडपात नवरदेवाच्या तोंडून निघालं असं काही की...; Funny Video आला समोर

हिंदू पद्धतीनं होणाऱ्या विवाहात (Indian Wedding) अनेक वेगवेगळे विधी (Wedding Rituals) होतात. यात पुजा होते, एकमेकांना वचन दिलं जातं

  नवी दिल्ली 03 जुलै : सोशल मीडियावर लग्नातील व्हिडिओ (Viral Wedding Video) मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral on Social Media) झाल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा नवरी आणि नवरदेवाची (Bride Groom) मस्तीच या व्हिडिओतून समोर येते तर कधी नातेवाईकांचे काही व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालेले असतात. सोशल मीडियावरील बरेच अकाऊंट तर खास लग्नातील असे मजेशीर आणि हैराण करणारे व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच लग्नातील असाच आणखी एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. VIDEO : समुद्राच्या मध्यभागी उडाला आगीचा भडका; विस्फोटामुळं हादरला किनारा हिंदू पद्धतीनं होणाऱ्या विवाहात (Indian Wedding) अनेक वेगवेगळे विधी (Wedding Rituals) होतात. यात पुजा होते, एकमेकांना वचन दिलं जातं, सात फेरे घेतले जातात, वरमाळेचा कार्यक्रम होतो तसंच हळदीचाही कार्यक्रम असतो. सोशल मीडियावर अशाच एका लग्नातील व्हिडिओ शेअर केला गेला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ब्राह्मण नवरदेव-नवरीला वेगवेगळी वचनं एकमेकांना देण्यासाठी सांगत आहे, मात्र इतक्यात त्याच्या तोंडून असं काही निघतं की सगळेच हैराण होतात.
  ..अन् बायकोनं पतीला धू-धू धुतलं; VIDEOमधील महिलेचा रुद्रावतार पाहून नेटकरी हैराण लग्नानंतर रुसवे फुगवे तर सुरुच असतात. नवरदेव आणि नवरीला ही वचनं एकमेकांना द्यायला सांगताना ब्राह्मणाला असंच काही आठवलं आणि ते म्हणाले, जेव्हा ती रुसेल तेव्हा मी तिची समजूत काढेल. यावर नवरदेव म्हणतो, अच्छा तुम्ही तिला मनवणार, हे ठीके. नवरदेवाचे हे बोल ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. हा व्हिडिओ आतापर्यंत 6 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. इतकंच नाही तर 25 हजारहून अधिकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. नवरदेवाच्या या उत्तरानं नेटकऱ्यांचंही मनोरंजन केलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Funny video, Marriage, Wedding

  पुढील बातम्या