मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे! आंब्याच्या रक्षणासाठी 4 गार्ड अन् 6 श्वान तैनात, वाचा काय आहे कारण

बापरे! आंब्याच्या रक्षणासाठी 4 गार्ड अन् 6 श्वान तैनात, वाचा काय आहे कारण

एका आंब्याच्या बागेसाठी गार्ड आणि श्वान तैनात (Security Guards to Protect Mango Trees) करण्यात आले आहेत. या आंब्यांची किंमत लाखो रुपये असून गार्ड आणि श्वान चोवीस तास बागेचं रक्षण करतात.

एका आंब्याच्या बागेसाठी गार्ड आणि श्वान तैनात (Security Guards to Protect Mango Trees) करण्यात आले आहेत. या आंब्यांची किंमत लाखो रुपये असून गार्ड आणि श्वान चोवीस तास बागेचं रक्षण करतात.

एका आंब्याच्या बागेसाठी गार्ड आणि श्वान तैनात (Security Guards to Protect Mango Trees) करण्यात आले आहेत. या आंब्यांची किंमत लाखो रुपये असून गार्ड आणि श्वान चोवीस तास बागेचं रक्षण करतात.

भोपाळ 18 जून : आतापर्यंत आपण देशात अतिमहत्त्वाच्या व्यक्ती म्हणजेच VVIP लोकांना झेड सुरक्षा दिली गेल्याचं पाहिलं असेल. अनेक लोक आपल्या घराच्या सुरक्षेसाठी गार्ड आणि श्वान ठेवत असल्याचंही तुम्ही पाहिलं असेल. मात्र, तुम्ही आंब्याच्या बागेच्या सुरक्षेसाठी गार्ड आणि श्वान ठेवले असल्याचं कदाचितच ऐकलं असेल. मात्र, मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) जबलपूरमधील चरगंवा रोडवर असलेल्या एका आंब्याच्या बागेसाठी गार्ड आणि श्वान तैनात (Security Guards to Protect Mango Trees) करण्यात आले आहेत. या आंब्यांची किंमत लाखो रुपये असून गार्ड आणि श्वान चोवीस तास बागेचं रक्षण करतात. या जपानी पद्धतीच्या आंब्याचं नाव टाइयो नो टमँगोश असं आहे. बागेचे मालक संकल्प सिंह परिहार यांनी सांगितलं, की मागील वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात हा आंबा 2.70 लाख रुपये प्रतिकिलो दरानं विकला गेला होता. त्यांनी सांगितलं, की नागपुरच्या व्यापाऱ्यानं एका आंब्यासाठी 21000 रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे.

दिल्ली परिवहन विभागाची नवीन पॉलिसी, नियमांचं पालन न केल्यास 10 हजार रुपयांचा दंड

परिहार यांनी सांगितलं, की बागेत एकूण 14 प्रकारचे आंबे आहेत. मात्र, या जपानी पद्धतीचे केवळ सात आंबे आहेत. या आंब्यांना अतिशय कडक संरक्षण दिलं गेलं आहे. हा आंबा साधारणतः जपानमध्ये येतो आणि याला तिथे एग ऑफ सन (Egg Of Sun) म्हणजेच सूर्याचं अंडे असं म्हटलं जातं, कारण हा आंबा पूर्णतः पक्व झाल्यानंतर लाल आणि पिवळ्या रंगाचा दिसतो. याचं वजनही तब्बल 900 ग्रॅम असतं. चवीला हा आंबा अतिशय गोड असतो. जपानमध्ये ही प्रजाती मोठ्या प्रमाणात आढळते मात्र परिहार यांनी आपल्या पडीक जमिनीमध्ये मोकळ्या वातावरणात ही बाग फुलवली आहे. लाखो रुपयांच्या आंब्याची बातमी जबलपूरमध्ये आगीसारखी पसरली आहे. याआधी बागेतील आंबे चोरी झाल्याची घटनाही समोर आली आहे, त्यामुळे परिहार यांनी आता बागेच्या सुरक्षेसाठी श्वान आणि गार्ड तैनात केले आहेत.

2 रुपयांचं हे नाणं बनवेल लखपती! वाचा कशी करता येईल 5 लाख रुपयांची कमाई

जपानच्या वातावरणात येणारी झाडं देशातील वातावरणात जेव्हा उत्तम पद्धतीनं येतात तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटणं सहाजिक आहे. संकल्प सिंह परिहार यांनी सांगितलं, की या बागेची सुरुवात काही झाडांपासून झाली होती आणि आज त्यांच्या बागेत 14 हायब्रिड आंबे आहेत. यातीलच एक आहे, भारतातील सर्वाच महागडा आंबा मल्लिका हा आंबा वजानानंही सर्वात जास्त असतो.

First published:
top videos

    Tags: Tree, Viral news