पेट्रोल-डिझेलची जुनी वाहनं चालवल्यास भरावा लागेल दंड, जाणून घ्या कारण

पेट्रोल-डिझेलची जुनी वाहनं चालवल्यास भरावा लागेल दंड, जाणून घ्या कारण

Vehicle Scrap Policty नुसार दिल्ली परिवहन विभागाने नुकताच नवा नियम जाहीर केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जून: जुन्या गाड्या भंगारात देण्यासंदर्भात कायदा करण्याविषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती. आता  दिल्लीवासीयांसाठी ही महत्वाची बातमी आहे. दिल्ली परिवहन विभागाने (Delhi government) नुकतेच व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी जाहीर केली आहे. या स्क्रॅप पॉलिसीमध्ये (Scrap policy) घोषित नव्या नियमांनुसार 15 वर्ष जुन्या पेट्रोल आणि 10 वर्ष जुन्या डिझेल (Scrap old diesel and petrol cars) वाहनांच्या मालकांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल. दरम्यान ज्या व्यक्ती त्यांची जुनी वाहनं (old vehicle) चालवतील त्यांना हा दंड भरावाच लागेल, असं राज्य सरकारने स्पष्ट केलंय. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दंडाच्या तरतुदीशिवाय दिल्ली परिवहन विभागाने आणखी एक घोषणा केली आहे. त्यानुसार जर ही जुनी वाहनं रस्त्यावर आढळली तर ती जप्त केली जाईल. त्यामुळे 10 वर्ष जुने डिझेल आणि 15 वर्ष जुनी पेट्रोल वाहनं वापरणं बंद करणं अनिवार्य झालं आहे.

प्रदूषण कमी होणार -

व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी (vehicle Scrap policy) भारत सरकारने (central government) आणली होती. या पॉलिसीमुळे दिल्लीत वाहनांच्या धुरामुळे होणारं प्रदुषण कमी होईल, अशी आशा दिल्ली सरकारला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court)एका निकालानुसार परिवहन विभाग यापुढे 10 वर्षांपेक्षा जुनी वाहनं रस्त्यावर आढळल्यास ती जप्त किंवा नष्ट करण्याचे आदेश देऊ शकते.

हे ही वाचा: मोठा धोका टळला, नाशिकमधील अपघातग्रस्त गॅस टँकर सुरक्षितरित्या उभा करण्यात यश

दिल्ली सरकारने घातली होती बंदी -

29 ऑक्टोबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीत 10 वर्ष जुन्या पेट्रोल आणि 15 वर्ष जुन्या डिझेल वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली. मोटार वाहन कायद्यानुसार 10 हजार ते 5 हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची या कायद्यात तरतूद आहे.

2,831 वाहनं केली स्क्रॅप

व्हेईकल स्क्रॅप पॉलिसीनुसार जुन्या प्रदूषण करणार्‍या वाहनांच्या स्क्रॅपिंगला चालना देण्यासाठी दिल्ली सरकारने चार वाहन स्क्रॅपिंग सेंटरची यादी जाहीर केली. या यादीमध्ये आणखी स्क्रॅपिंग सेंटरचा समावेश करण्याची शक्यता आहे. दिल्ली-एनसीआर सध्या जवळपास 3.5 लाख वाहनं अशी आहेत, जी स्क्रॅपिंग केली जाऊ शकतात. यावर्षीच्या 30 मे पर्यंत राजधानीत जवळपास 2,831 वाहनं स्क्रॅप करण्यात आली. ही संख्या स्क्रॅपिंगयोग्य वाहनांच्या तुलनेत 1 टक्क्यांपेक्षाही कमी आहेत.

प्रदुषण रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचा काही फायदा होतोय का हे येत्या काळात बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Published by: Prem Indorkar
First published: June 18, 2021, 9:17 AM IST

ताज्या बातम्या